सचिन पिळगावकर आणि अशोक सराफ यांचा नवरा माझा नवसाचा हा सिनेमा खूप गाजला. सिनेमा गाजलाच पण त्यासोबतच चित्रपटातील चला जेजुरीला जाऊ हे गाणे देखील लोकप्रिय झाले. किशोरी शहाणे यांचा हा कॅमिओ सगळ्यांनाच खूप आवडला होता. अशातच किशोरी शहाणे यांनी या लावणीबाबत काही किस्से शेअर केले आहेत. त्यांनी त्यावेळी सिनेमातून ब्रेक घेतला होता. तरी देखील त्यांना हे लावणी करायला लागली होती. त्यावेळी नक्की काय झाले होते? हे जाणून घेऊया.
यावेळी किशोरी शहाणे म्हणाल्या की, “मला सचिनचा कॉल आला आणि ते मला म्हणजे फार मोठा रोल नाहीये. छोटासा रोल आहे. तुझी आणि अशोकची एक मिनी लव्हस्टोरी आहे. त्यावेळी तुमच्या पिक्चरसाठी काहीही ! असं मी त्यांना म्हणाले.”
पुढे त्या म्हणाल्या की, “तेव्हा मी जवळपास १० वर्ष सिनेमांत काम केले नव्हते. माझं लग्न झाल्यावर माझं प्राधान्य माझ्या संसाराला होतं. बॉबी देखील मोठा होत होता. मी मालिकेत काम करत होते, कारण मला मुंबई बाहेर जायचे नव्हते. मुलगा १० वर्षाचा होईपर्यंत मुंबईतच राहायचं, बाहेर जायचं नाही असा माझा विचार होता. त्यावेळी सचिनजी म्हणाले की, शूटिंग मुंबईतच आहे तेव्हा मी लगेच होकार दिला.”
किशोरी शहाणे पुढे म्हणाल्या की, “ही लावणी झाली तेव्हा वाटलं नव्हती की, ती एवढी गाजेल. ही लावणी का गाजली माहित आहे का? कारण ती धार्मिक नव्हती . अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत कोणीही यावर डान्स केला तरी वावगं वाटणार नाही. यावर लहान लहान मुली डान्स करतात. मी जेव्हा कॉलेजमध्ये जाते तेव्हा स्पेशली माझ्यासाठी या गाण्यावर लावणी सादर केली जाते.” अशाप्रकारे किशोरी शहाणे यांनी चला जेजुरीला जाऊ या लावणीचा अनुभव शेअर केला आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
‘मला लग्न करण्यात इंटरेस्ट नव्हता पण…’ उषा नाडकर्णी यांनी पहिल्यांदा केले लग्नाबाबत मत व्यक्त
‘कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सलग 6 तास काम केले’, रश्मिकाने ‘कुबेरा’च्या शूटिंगचा अनुभव केला शेअर