शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान अं’मली पदार्थ प्रकरणात सापडल्यापासून अनेक गोष्टींचा खुलासा होत आहे. एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी आर्यन खानला अटक केले आहे. तसेच त्याला अटक होऊन आता जवळपास महिना होत आला आहे. तरी देखील कोर्टाने त्याला जामीन दिला नाही. यातच एनसीबी अधिकारी समीर वानखेडे हे जोरदार चर्चेत आहेत. या प्रकरणानंतर त्यांच्यावर अनेक आरोप लावले जात आहे.
राजकीय नेते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. त्यांच्यावर खंडणी घेतल्याचा आरोप लावला आहे. तसेच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत देखील टिप्पणी होत आहेत. या सगळ्यात त्यांची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर त्यांच्यासोबत खंबीरपणे उभी असलेली दिसत आहे. पतीवर लावल्या गेलेल्या आरोपांना ती चुकीचे सिद्ध करत आहे. मागील अनेक दिवसांपासून ती सोशल मीडियावर तिचे मत मांडत आहे. तसेच माध्यमांशी देखील तिने याबाबत संवाद साधला आहे. अशातच तिने आता थेट महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती पत्र लिहून ते सोशल मीडियावर शेअर केले आहे. (Actress kranti redkar write letter to chief minister of Maharashtra state)
क्रांतीने ट्विटर अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. हा पोस्ट शेअर करताना तिने लिहिले आहे की, माननीय उद्धव ठाकरे साहेब, पत्रास कारण की,…” यापुढे तिने पत्रात लिहिले आहे की, “माननीय उद्धव साहेब ठाकरे, लहानपणापासून मराठी माणसाच्या न्याय, हक्कासाठी लढणारी शिवसेना पाहत मोठी झाली. मी एक मराठी मुलगी आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदूहृदयसंम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श घेऊनच मी वाढले. कोणावर अन्याय करू नये आणि आपल्यावर झालेला अन्याय तर मुळीच सहन करू नये. हेच मी त्या दोघांकडून शिकले. तो धडा गिरवत मी एकटीने माझ्या खाजगी जीवनावर हल्ला करणाऱ्या उपद्रवी लोकांविरोधात ठामपणे उभी आहे, लढते आहे.”
माननीय उद्धव ठाकरे साहेब @CMOMaharashtra पत्रास करण की … pic.twitter.com/0VJxURk5oi
— Kranti Redkar Wankhede (@KrantiRedkar) October 28, 2021
पुढे तिने लिहिले की, “सोशल मीडियावरचे लोक फक्त मजा बघत आहेत. मी एक कलाकार आहे. राजनीती मला कळत नाही आणि मला त्यात पडायचं सुद्धा नाही. आमचा काहीही संबंध नसताना रोज सकाळी आमच्या अब्रूची लख्तरे चारचौकात उधळली जातात. शिवरायांच्या राज्यात एका स्त्रीच्या गरिमेचा खेळ करून ठेवला आहे. विनोद करून ठेवलाय. आज बाळासाहेब असते तर त्यांना हे नक्कीच पटले नसते. एका महिलेवर आणि तिच्या परिवारावर होणारे खाजगी हल्ले हे राजकारणाचे किती नीच स्वरुप आहे. हे त्यांच्या विचारातून आपल्यापर्यंत पोहोचलं आहे आज ते नाही तर तुम्ही आहात. त्यांची सावली त्यांची प्रतिमा आम्ही तुमच्याच बघतो. तुम्ही आमचे नेतृत्व करता आणि तुमच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. तुम्ही कधीच कुटुंबावर अन्याय होऊ देणार नाहीत याची मला खात्री आहे म्हणून एक मराठी माणूस म्हणून आज मी तुमच्याकडे न्यायाने, अपेक्षेने पाहत आहे. तुम्ही योग्य तो न्याय करा अशी विनंती. आपली बहीण क्रांती रेडकर.”
तिच्या या पत्राला आता उद्धव ठाकरे काय प्रतिक्रिया देणार आहेत, हे बघण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. क्रांती ही मराठी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने अनेक चित्रपटात काम करून प्रसिद्धी मिळवली आहे. तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बोलायचे झाल्यास तिला आणि समीर वानखेडे यांना दोन जुळ्या मुली आहे. समीर वानखेडे यांचे क्रांती सोबतचे हे दुसरे लग्न आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
–‘माझ्यासोबत एका दिग्दर्शकाने सेटवरच केली होती शिवीगाळ’, ईशा गुप्ताचा खुलासा
–अमिताभ बच्चन यांचा ‘हा’ फोटो पाहिल्यावर तुम्ही देखील नक्कीच म्हणाल, ‘वय हा फक्त आकडा आहे’
–‘कोणाचीही मुलगी, बहीण किंवा आई असूदे, मी तिच्याशीच लग्न करणार’, वाचा परेश रावल यांची लव्हस्टोरी