Wednesday, July 3, 2024

फिटनेसप्रेमी क्रिती सेननला आवडत नाहीत ‘हे’ चार व्यायामप्रकार, पाहा अभिनेत्रीचा व्हिडिओ

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या स्वत:च्या तब्येतीकडे लक्ष देतात. त्यात आवर्जुन समावेश करावा अशी अभिनेत्री म्हणजे, क्रिती सेनन होय. क्रिती तिच्या अभिनयाव्यतिरिक्त तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळेही चांगलीच चर्चेत असते. याचा प्रत्यय चाहत्यांना वेळोवेळी आला आहे. यासोबतच ती आपल्या चाहत्यांना सोशल मीडियामार्फत आपल्या फिटनेस रुटीनबाबत सांगून ती त्यांना व्यायाम आणि योगासाठी प्रेरितही करते. नेहमीच फिटनेससाठी प्रेम दाखवणारी क्रितीने आता त्या व्यायाम प्रकारांबाबत सांगितले आहे, जे तिला अजिबात आवडत नाहीत. चला तर जाणून घेऊया कोणते आहेत, ते व्यायामप्रकार.

खरं तर, अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon) हिने तिच्या ‘मिमी’ या सिनेमातील आपल्या भूमिकेसाठी जवळपास १५ किलो वजन वाढवले होते. त्यानंतर क्रितीने तिचा वजन कमी करण्याच्या प्रवास सुरू केला आणि आता सोशल मीडियावर आपला हा प्रवास चाहत्यांसोबत शेअर केला आहे. शनिवारी (दि. २५ जून) क्रितीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक वर्कआऊट व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तिने खुलासा केला की, तिला कोणते व्यायामप्रकार आवडत नाहीत.

या व्हिडिओत क्रिती अशा चार व्यायाम प्रकारांबाबत सांगत आहे, जे करताना तिला कठीण वाटतात. मात्र, असे असूनही ते व्यायामप्रकार ती करते. तिने आपल्या पोस्टमध्ये सांगितेल आहे की, तिला ऑस्ट्रेलियन पुल्स, बारबेल बॅक स्क्वॉट्स, जॉगिंग आणि हँगिग नी ट्रक्स करणे बिल्कुल आवडत नाहीत. तिने हा व्हिडिओ शेअर करत सांगितले आहे की, “हे व्यायामप्रकार मला आवडत नाहीत. मात्र, मी तरीही ते करत आहे. कारण, तुम्ही कधीही तुमच्या कंफर्ट झोनमध्ये विकसित होऊ शकत नाहीत.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Kriti (@kritisanon) 

क्रितीने हा व्हिडिओ शेअर करताच या व्हिडिओवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पाडला. तिच्या या व्हिडिओला आतापर्यंत ३ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच, तिच्या जिम ट्रेनर करण साहनी यानेही कमेंट करत लिहिले आहे की, “कॅप्शन.” यामध्ये त्याने फायर इमोजीचाही समावेश केला. यापूर्वी क्रितीने पाच अशा व्यायाम प्रकारांबाबत सांगितले होते, जे तिला जिममध्ये करताना आवडतात. त्यात जिममध्ये ती घाम गाळताना दिसली होती.

क्रिती सेननच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर तिने आतापर्यंत १७ सिनेमात काम केले आहे. २०२२ या वर्षी रिलीझ झालेल्या ‘हिरोपंती २’ आणि ‘बच्चन पांडे’ या सिनेमात ती झळकली होती. आता ती ‘भेडिया’, ‘गणपत’, ‘शहजादा’, ‘आदिपुरुष’ आणि ‘हाऊसफुल ५’ या सिनेमात दिसणार आहे.

हे देखील वाचा