Thursday, November 30, 2023

‘या’ कारणामुळे डिप्रेशनमध्ये होता सुशांत सिंग राजपूत, क्रिती सेननचा मोठा खुलासा

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपुतच्या (Sushant Singh Rajput) मृत्युने अवघ्या सिनेसृष्टीला जोरदार धक्का बसला होता. एक हरहुन्नरी कलाकार म्हणुन संपुर्ण सिनेसृष्टीत त्याची ओळख होती. आपल्या कसदार अभिनयाने अल्पावधितच असंख्य चाहते त्याने कमावले होते. यशाच्या शिखरावर असलेल्या कलाकाराने आत्महत्येचा मार्ग का निवडला असावा, हे आजही न उलगडलेलं कोडं आहे. त्याच्या मृत्युनंतर कित्येक दिवस हा वाद सुरु होता. मात्र खरं कारण अद्यापही समोर येऊ शकल नाही. याच पाश्वभुमीवर अभिनेत्री क्रिती सेननने (Kriti Sanon) मोठा खुलासा केला आहे.

अभिनेत्री क्रिती सेननने सुशांत सिंग राजपूतसोबत ‘राबता’ या चित्रपटात काम केले होते. जो पुर्णपणे फ्लॉप ठरला होता.
सुशांत आता आपल्यामध्ये नसला, तरी क्रिती सेननने त्याच्याबद्दल बोलताना या चित्रपटाच्या खराब प्रदर्शनानंतर तो पुर्णपणे डिप्रेशनमध्ये गेल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. एका रात्री ती, सुशांत आणि चित्रपटाचे दिग्दर्शक भेटले होते आणि वाइन पिता पिता ‘राबता’ चित्रपटाच्या खराब प्रदर्शनाबद्दल चर्चा केल्याचंही तिने यावेळी सांगितलं. (kriti sanon reveals she and sushant singh rajput discussed raabta bad reviews)

एका मुलाखतीत बोलताना क्रिती म्हणाली की, “जे काही झालं त्याचा स्वीकार केला पाहिजे. तुम्ही प्रेक्षकांसाठी चित्रपट बनवता, तेव्हा तुम्ही असं नाही म्हणू शकत की त्यांना तो समजला नाही. जर त्यांना समजला नसेल, तर ती तुमची चूक आहे. त्यावेळी तुम्ही असं नाही म्हणू शकत की, आम्ही काळाच्या पुढे होतो. तुम्ही कुठे चुकला याचा शोध तुम्हालाच घ्यावा लागेल.”

डिप्रेशनमध्ये होते तिघेही…
याबद्दल बोलताना क्रिती पुढे म्हणाली की, “ती खुपच मजेशीर रात्र होती, आम्ही सगळे निराश आणि तणावात होतो. चित्रपटाला खूपच खराब प्रतिसाद मिळाला होता. आम्हाला काहीच समजत नव्हतं, की काय बोलावं. चित्रपटाचे दिग्दर्शक दिनेश विजानची अवस्थाही अशीच होती. या, मित्रांनो बसा म्हणत त्यांनी आम्हाला बोलावलं आणि आम्ही तिथे जाऊन वाइनची बाटली उघडली. त्यावेळी डिनो (दिनेश विजान) म्हणाले की, ‘मला वाटतंय हा फ्लॅशबॅक आहे. मी हे आणखी सोपं बनवायला पाहिजे होतं. ड्राफ्टमध्ये पहिल्यांदा सामान्य राजा रानीची कथा होती आणि ते प्रेक्षकांशी जास्त समरुप होती. परंतु आपल्याला वाटलं की, यामध्ये थोडा बदल केला पाहिजे.’ तेव्हा माझ्या हातात वाईनची बाटली होती आणि मी म्हणाले, ‘मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं.”

 

२०२० मध्ये झाला सुशांतचा मृत्यू
क्रिती सेनन आणि सुशांत सिंग राजपूतचा ‘राबता’ चित्रपट २०१७ मध्ये प्रदर्शित झाला होता. अभिनेता राजकुमार राव, जिम शर्भ, आणि वरुण शर्मानेही या चित्रपटात काम केले होते. दिग्दर्शक दिनेश विजाननी याच चित्रपटाद्वारे दिग्दर्शनाला सुरुवात केली होती. सोबतच ते सहनिर्मातेसुद्दा होते. हा चित्रपट दोन प्रेमियुगुलांच्या पुर्नजन्मावर आधारित होता. दुर्दैवाने २०२० च्या लॉकडाउनमध्ये सुशांत सिंग राजपूत त्याच्या घरात संशयास्पदरित्या मृतावस्थेत आढळून आला. या घटनेने चित्रपटसृष्टीला जोरदार धक्का बसला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा :

हे देखील वाचा