Saturday, October 18, 2025
Home बॉलीवूड किसिंग सीनमध्ये लारा दत्ताला नाही कोणतीही अडचण, सांगितली कशी होती पती महेश भूपतीची प्रतिक्रिया

किसिंग सीनमध्ये लारा दत्ताला नाही कोणतीही अडचण, सांगितली कशी होती पती महेश भूपतीची प्रतिक्रिया

बॉलिवूड चित्रपटांमध्ये रोमँटिक सीन, किसिंग सीन आणि इंटिमेट सीन शूट करणे सर्वसाधारण झाले आहे. पूर्वी यासाठी खूप अडचणींना सामोरे जावे लागत होते. मात्र, आता हे सर्व शूट करणे प्रचंड सोपे झाले आहे. नुकतेच आता बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ताने तिला ऑनस्क्रीन किसिंग सीन करण्यात कोणतीही अडचण नाही, असे तिने स्पष्टपणे सांगितले आहे.

इंटिमेट सीन हे खूप टेक्निकल असतात आणि शूटिंग सेटची गरज असते, असे तिचे मत आहे. लारा दत्ता म्हणते की, जसे ऍक्शन सीन केले जातात तसे इंटिमेट सीन देखील कोरिओग्राफ केले जातात.

लारा दत्ता म्हणाली…
लाराचा नवीन शो ‘हिकअप्स अँड हुकअप्स’ येणार आहे. माध्यमांशी साधलेल्या संवादात लारा म्हणाली की, “एक अभिनेत्री म्हणून मला सर्व प्रकारच्या क्षेत्रात काम करायचे आहे, पण भारतात मी कोणाची तरी पत्नी आहे. पाहिलं तर आपल्याला एक अट दिली जाते, जी आपल्या आत असते. मी एक असा शो करणार आहे, ज्यामध्ये थोडीफार मागणी असेल, अशा परिस्थितीत मला थोडा विचार करणे आवश्यक आहे.”

लाराने असेही सांगितले की, तिने पती महेश भूपतीसोबतही शोमध्ये चर्चा केली होती. “महेशसोबतही शो समजून घेणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे होते कारण तो किती कम्फर्टेबल आहे, हे मला समजून घ्यायचे होते. सीन्समध्ये मी कुठपर्यंत जाऊ शकते, त्याचे परिणाम काय आहेत, माझा सेफ्टी झोन ​​काय आहे, मर्यादा काय आहे,” या गोष्टींबद्दल लाराला जाणून घ्यायचे होते.

इंटिमेट सीनबाबत लारा म्हणाली की, “मी हे आधी केले आहे. मला ऑनस्क्रीन किसिंग सीन करायला काहीच हरकत नाही. मी ठीक आहे कारण मला माहित आहे की, हे सीन शूट करण्यासाठी किती टेक्निकल आहेत. तुम्ही सेटवर पोहोचल्यावर हे सीन घडत नाहीत, तुम्ही दोन कलाकारांना एकत्र ठेवू नका, जा आणि किस घ्या आणि केमिस्ट्री दाखवा असे म्हणू नका, हे सीन तेव्हाच घडतात, जेव्हा ते कागदावर लिहिलेले असतात आणि योग्य वेळ असते.”

‘हिकअप्स अँड हुकअप्स’ शोचे दिग्दर्शन कुणाल कोहली यांनी केले आहे. शोमध्ये प्रतिक बब्बर, दिव्या सेठ, नस्सर अब्दुल्ला आणि मयंक चांग हे कलाकार आहेत. लारा दत्ता ही एक चित्रपट अभिनेत्री आहे. तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिचे चित्रपट खूप पसंत केले गेले आहेत. ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करते, ज्यांना प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळतो.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अतरंगी कथा असणाऱ्या आणि प्रेमाचा त्रिकोण दाखवणाऱ्या ‘अतरंगी रे’ सिनेमाचा धमाल ट्रेलर रिलीझ

-हाय गर्मी! मोनालिसाने मिनी स्कर्ट घालून केला जबरदस्त डान्स, ओलांडल्या बोल्डनेसच्या सर्व मर्यादा

-बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रीचा बालपणीचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, क्यूटनेस पाहून चाहतेही दंग

हे देखील वाचा