Saturday, July 6, 2024

‘मरशील ना…’, मॉडेल लोपामुद्राचे बर्फातील बिकिनी फोटोशूट पाहून चाहत्याची कमेंट

टीव्हीवरील लोकप्रिय शो ‘बिग बॉस’ने अनेक कलाकारांना एक नवीन ओळख दिली आहे. त्यामध्ये अनेक लहान-मोठ्या कलाकारांनी चाहत्यांचे मनोरंजन त्यांच्या मनात एक विशेष स्थान बनवले आहे. याच शोच्या १० व्या हंगामात हॉटनेसचा तडका लावणारी मॉडेल म्हणजेच ‘लोपामुद्रा राऊत’. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींमध्ये लोपामुद्राचाही समावेश होतो. ती नेहमीच आपले ग्लॅमरस फोटो शेअर करत चाहत्यांशी संवाद साधत असते. तिने नुकतेच बोल्ड फोटो शेअर केले आहेत, यामुळे ती चर्चेत आली आहे. तिच्या या फोटोंवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.

तिने नुकतेच आपले बर्फाळ प्रदेशातील बिकिनी फोटोशूट केले आहे. चाहत्यांनी नेहमीच त्यांच्या आवडत्या अभिनेत्रींना समुद्र किनाऱ्यावर बिकिनी घातलेले पाहिले असेल, परंतु बर्फाळ प्रदेशातील लोपामुद्राचा हा लूक चाहत्यांना आपल्याकडे आकर्षित करत आहे.

या फोटोंमध्ये ती गुलाबी बिकिनीमध्ये दिसत आहे. तिने आपल्या हातात कॉफी मग आणि डोक्यावर टोपी घातली आहे. हे हॉट फोटो शेअर करत तिने ‘बर्फ काय!!??’ अशा आशयाचे कॅप्शन दिले आहे. यासोबतच तिने snow, hotchocolate, love, fun असे हॅशटॅग्जही दिले आहेत.

काही चाहत्यांना लोपामुद्राचा हा अंदाज भलताच भावला आहे, तर काहींनी तिच्या या लूकवर विचित्र प्रश्न विचारले आहेत. तिचा हा लूक पाहून एका युजरने म्हटले आहे की, ‘वेडी झाली आहेस का?’ दुसऱ्या एका चाहत्याने म्हटले की, ‘इतक्या थंडीत मरशील.’

लोपामुद्रा ही प्रसिद्ध मॉडेलसोबतच अनेक सौंदर्यवती स्पर्धांमध्ये सहभागी झाली आहे. याव्यतिरिक्त सन २०१६ मध्ये ‘मिस युनायटेड कॉन्टिनेंट्स’ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. यामध्ये ती द्वितीय रनरअप राहिली होती. तसेच गोव्यात सन २०१३ मध्ये झालेल्या ‘मिस इंडिया काँटेस्ट’मध्ये भाग घेतला होता. तिथे ती प्रथम रनरअप होती.

लोपामुद्राने सन २०१६ मध्ये बिग बॉसच्या १० व्या हंगामात भाग घेतला होता. बिग बॉसमध्ये लोपाने चाहत्यांचे चांगले मनोरंजन केले होते. सुपरस्टार सलमान खान शोमध्ये तिचे तोंडभरून कौतुक करत असायचा.

लोपामुद्राने सन २०१७ साली ‘खतरों के खिलाडी’ शोच्या ८ व्या हंगामातही आपला सहभाग नोंदवला होता. आपल्या हिमतीच्या जोरावर तिने या शोमधील उपांत्य फेरीत धडक मारली होती. याव्यतिरिक्त तिने सन २०१९ मध्ये आलेल्या ‘द वर्डिंक्ट- स्टेट्स वर्सेस नानावती’ या टीव्ही सीरिजमध्येही काम केले होते.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-विवेक ओबेरॉयच्या प्लेटमध्ये ऑम्लेटच्या जागी चक्क हेल्मेट! मजेशीर व्हिडिओ सोशलवर व्हायरल

हे देखील वाचा