Friday, April 19, 2024

नेहा कक्कर अन् गुरु रंधावा प्रथमच आले एकत्र, पाहा या जोडीचे ‘और प्यार करना है’ हे ताजं गाणं

नेहा कक्करने आपल्या सुरेल आवाजाने अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. अनेक चित्रपटातपासून ते स्टेजशोपर्यंत तिची प्रत्येक ठिकाणी डिमांड आहे. आपल्या मेहनतीच्या जोरावर तिने जे नाव कमावले आहे, त्यासाठीचा तिच्या आयुष्यातील संघर्ष काही सोपा नव्हता. इंडियन आयडॉलच्या कार्यक्रमात स्पर्धेक पासून ते परीक्षक असण्यापर्यंतचा प्रवास खूप कठीण होता. आपल्या सर्व कठीण परिस्थितीवर मात करून एक आदर्श गायक म्हणून ती नावारूपास आली आहे. आता प्रत्येक गायक तिच्या सोबत गायला मिळावे यासाठी धडपड करत असतात. तिने गायलेले प्रत्येक गाणी हे आजही चाहत्यांना भावतात.

नुकतेच नेहा कक्कर आणि पंजाबी गायक गुरू रंधावा यांचे नवीन गाणे रिलीज झाले आहे. या जोडीचे हे पहिलेच गाणे आहे. “और प्यार करना है’ असे या गाण्याचे बोल असून, युट्युबवर हे गाणे चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस पडत आहे. दोन्ही गायकांची ही जोडी प्रेक्षकांची मने जिंकण्यास यशस्वी ठरली आहे. या व्हिडिओमध्ये गुरु आणि नेहाची भन्नाट केमिस्ट्री दाखवण्यात आली आहे. भूषण कुमारच्या टी सिरीजने हे गाणे प्रसिद्ध केले आहे.

ह्या गाण्यात नेहा आणि गुरू या दोघांना कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो हे दाखवले गेले आहे, याशिवाय गाण्यात गुरूचा आधीच मृत्यू झालेला असतो आणि नेहा त्याला आठवायचा प्रयत्न करत असते. त्याचवेळी तिचा सुध्दा मृत्यू होतो. गाण्याचे बोल हे सैद चौक्रि यांनी लिहिले असून, साचेत परमपारा यांनी या गाण्याला संगीत दिले आहे.

नेहा आणि रोहन हे आपल्या सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. त्यामुळे त्यांनी हे गाणे आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर देखील शेअर केले आहे. त्यांच्या चाहत्यांना हे गाणे आवडले असून त्यावर त्यांना खूप प्रतिक्रिया येत आहेत.

नेहा कक्कर आणि रोहनप्रीत यांच्या लग्नानंतर त्यांनी अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. तिचा आणि रोहनचा बेबी बम्प सोबतचा फोटो तर चाहत्यांच्या चर्चेचा विषय बनून राहील होता. रोहन सोबत नवनवीन फोटो अपलोड करत ती त्याच्यासोबत किती खुश आहे हे तिच्या प्रत्येक फोटोमार्फत नेहमीच दिसत असते. इतकेच नव्हे तर ती सध्या इंडियन आयोडॉल या संगीत कार्यक्रमात आपल्या सुंदर अशा लूक आणि अदांनी नेहमीच चाहत्यांचे मन वेधून घेत असते. शिवाय याच कार्यक्रमात तिने अनेकांना मदत सुद्धा केली आहे, ज्यात जेष्ठ गीतकार संतोष आनंद यांचा समावेश सुद्धा होता.

सन २००६ मध्ये इंडियन आयडॉलची स्पर्धक म्हणून आलेल्या नेहाने नंतर मागे वळून पहिलेच नाही. आजपर्यंत तिने आपल्या प्रवासात अनेक हिट गाणी दिली आहेत. ज्यात सन्नी सन्नी, मनाली ट्रेस, धतींग नाच, लंडन ठुमकदा, जादू की झप्पी, काला चष्मा या गाण्याचा समावेश आहे. शिवाय तिचे ‘ मिले हो तुम हमको’ हे गाणे हे भारतातील लोकप्रिय गाण्यांपैकी एक आहे.

हे देखील वाचा