Friday, July 5, 2024

धक्कादायक! अभिनेत्री मधुबालाच्या ९६ वर्षांच्या बहिणीला सुनेने घराबाहेर काढलं, कारण…

सासू-सुनेतील भांडणं फक्त छोट्या पडद्यावरच नाही, तर मोठ्या पडद्यावर झळकणाऱ्या दिग्गज अभिनेत्रींच्या घरातही पाहायला मिळतात. असं फार क्वचितच घडत असेल, पण हे खरंय. हिंदी सिनेसृष्टी गाजवणारी दिग्गज अभिनेत्री मधुबालाची मोठी बहीण असलेल्या कनीज बलसारा यांना हा वाईट अनुभव आला आहे. ९६ वय असलेल्या कनीज यांना त्यांच्या सुनेनेच घराबाहेर काढलं आहे. इतक्या वयस्कर असलेल्या कनीज यांना न्यूझीलंडच्या ऑकलंडमधून पैसे आणि कोणत्याही पाठिंब्याशिवाय त्यांची सून समीनाने मुंबईच्या फ्लाईटमध्ये बसवून भारतात पाठवलं. त्यांची फ्लाईट २९ जानेवारी रात्री ८ वाजता मुंबईत लँड झाली. मुंबईत राहणाऱ्या त्यांच्या पुतणीला, कनीज यांच्या येण्याची माहिती समीनाने नाही, तर तिच्याच चुलत बहिणीने दिली. आपल्यासोबत घडलेलं या वाईट घटनेचा किस्सा कुठून आणि कसा सुरू झाला, हे त्यांच्या पुतणीने माध्यमांशी बोलताना सांगितला आहे.

कनीज (Kaniz Balsara) आपल्या पतीसोबत मागील १७- १८ वर्षांपूर्वी न्यूझीलंडला गेल्या होत्या. तिथे जाण्यामागील कारण सांगताना त्यांची पुतणी परवेजने संपूर्ण कहाणी सांगितली. ती म्हणाली की, “त्यांचे मुलगा फारुकवर खूप प्रेम होते आणि त्याच्याशिवाय त्या राहू शकत नव्हत्या, त्यामुळे त्या तिकडे गेल्या होत्या. माझा भाऊही आपल्या आईवर खूप प्रेम करत होता. तो जेव्हा न्यूझीलंडला गेला, तेव्हा आई-बाबांनाही सोबत घेऊन गेला. फारुक न्यूझीलंडमध्ये करेक्शन डिपार्टमेंटमध्ये काम करतो. तो तेथील सन्मानित व्यक्तींमध्ये गणला जातो. मात्र, आमच्या वहिनी समीनाला आमचे आई-वडील आवडत नव्हते.”

परवेजने सांगितल्याप्रमाणे, जेव्हा समीनाने आपल्या वागण्यात सुधारणा आणण्यास स्पष्ट नकार दिल्यानंतर, या कहाणीने न्यूझीलंडमध्ये खूपच भयानक रूप घेतले. पुढे सांगताना ती म्हणाली की, “ती कधी घरात आमच्या आई-वडिलांसाठी जेवण बनवत नव्हती. माझा भाऊ फारुक आई आणि बाबांसाठी जवळच्या रेस्टॉरंटमधून जेवण घेऊन यायचा. समीनाची मुलगी म्हणजेच कनीज यांच्या नातीचे लग्न ऑस्ट्रेलियात झाले. तीदेखील आमच्या आईसोबत अशाच वाईटप्रकारे वागते. जेव्हा आईने घर सोडले आणि तिला विमानात बसवले, तेव्हा ती आपल्या भावासोबत तिथेच होती.”

“मी बर्‍याचदा न्यूझीलंडला जाते, कधीकधी वर्षातून दोनदा. आईसुद्धा दोनदा इथे यायची, पण ती गेली ५ वर्ष आली नाही. कारण, माझ्या भावाने सांगितले की, या वयात येणं तिच्यासाठी सुरक्षित नाही, कारण जास्त उंचीवर ऑक्सिजनच्या लेव्हलमध्ये अनेक समस्या येतात,” असेही परवेजने सांगितले.

मधुबालाची धाकटी बहीण मधुर भूषणने माध्यमांना सांगितले की, “मला धक्का बसला आहे. माझ्या बहिणीला अशी वागणूक देण्यात आली आहे, हे सांगण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत.” तिने पुढे सांगितले की, “माझ्या बहिणीला तिची पेन्शनही मिळत नव्हती, तिच्याकडून पैसेही घेतले जायचे.”

परवेझला कनीजच्या आगमनाची माहिती त्याच्या चुलत बहिणीने दिली, जिला समीनाने विमान उतरण्याच्या ८ तास आधी कळवले. ती म्हणाला, “समीनाने तिला मेसेज करून सांगितले, पण आम्हाला कळवले नाही. मी इथे मुंबईत नव्हते, पालघरला होते. माझ्या चुलत बहिणीने २९ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता सांगितले, मला मुंबईला पोहोचण्यासाठी ८ तास होते, जेणेकरून मी वेळेवर पोहोचू शकेन.”

“या वर्षी ८ जानेवारीला भावाचे निधन झाल्याने समीनाचा छळ वाढला होता. विचार करा माझा भाऊ सोडून एक महिनाही झाला नाही,” हे दु:खही परवेजने पुढे बोलून दाखवले.

त्याहून वाईट म्हणजे, फ्लाईट लँड झाल्यानंतर, परवेझला विमानतळ प्राधिकरणाकडून कॉल आला आणि सांगितले गेले की, तिच्या आईकडे आरटीपीसीआरसाठी पैसे नाहीत. “मी तिला पैसे पाठवले आणि मग आरटीपीसीआर टेस्ट झाली. त्यानंतर तिने मला पहिल्यांदा हे सांगितले की, बेटा तुला माहित आहे का? की फारुखचे निधन झाले आहे? मी त्याला कब्रमध्ये टाकून आले आहे. मी खूप भुकेली आहे, मला काही खायला मिळेल का?” असेही तिने पुढे बोलताना सांगितले.

हेही पाहा- बाई वाड्यावर या’ बोलणाऱ्या निळू भाऊंनी लहान असताना स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता | Nilu Fule

परवेझ म्हणाली की, “मी तिना घरी आणले, जेवण दिले आणि मग आंघोळ घातली. देवाचे आभार, निदान आई सुरक्षित आहे. जेव्हा मी तिला पहिल्यांदा मुंबई विमानतळावर पाहिले, तेव्हा तिला मदत करण्यासाठी आजूबाजूला कोणी प्रवासी नव्हता.”

कनीज यांना त्यांच्या सुनेने दिलेली वागणूक किती त्रासदायक असेल, याची कल्पनाही करवत नाही.

हेही वाचा-

हे देखील वाचा