Thursday, June 13, 2024

लग्नानंतर लंडनला गेल्यावर किशोर कुमारांना मिळाली होती मधुबालाबद्दल ‘ही’ धक्कादायक माहिती; मग थेट मामाच्या घरी…

बॉलिवूडचे ज्येष्ठ गायक आणि अभिनेते किशोर कुमार यांचा आवाज व अभिनयावर लाखो चाहते फिदा आहेत. त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर सर्व चाहत्यांची मने जिंकली. त्यांचा जन्म 4 ऑगस्ट, 1929 रोजी झाला होता. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांचं नाव आदराने घेतले जाते. बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये विविध प्रकारच्या पात्रांची भूमिका त्यांनी साकारली आहे. त्यातील काही भूमिका चाहत्यांच्या मनावर आजही आधिराज्य गाजवत आहेत. दरम्यान, त्यांच्या चित्रपटांपेक्षा वैयक्तिक आयुष्यातील जास्त किस्से चर्चेचा विषय ठरले आहेत आणि ठरत असतात.

किशोर कुमार (Kishore Kumar) यांचे चार विवाह झाले आहेत. त्यातील अभिनेत्री मधुबाला ही देखील त्यांची पत्नी आहे. किशोर कुमार यांना भेटण्यापूर्वी मधुबाला दिलीप कुमारांच्या प्रेमात होती. दोघे जवळ जवळ 9 वर्षे एकमेकांना डेट करत होते. दोघांच्या लग्नाला कुटुंबातील नातेवाईकांचा विरोध होता. त्यामुळे ते दोघेही वेगळे झाले. त्यानंतर मधुबाला किशोर कुमारांना भेटली. तोपर्यंत किशोर कुमार यांचा पहिली पत्नी रुमा देवीशी घटस्फोट झाला होता. याच वेळी दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले.

एके दिवशी किशोर कुमारांनी मधुबालाकडे लग्नासाठी मागणी घातली, तेव्हा तिने लगेच होकार दिला‌. 1960 मध्ये दोघांनी लग्न केले. त्यावेळी मधुबाला 27 वर्षांची होती. लग्नानंतर दोघे लंडनला गेले. तिथे एक दिवस अचानक मधुबालाची तब्येत बिघडली. त्यावेळी डॉक्टरांना भेटल्यावर कळले की, मधुबालाच्या हृदयात छिद्र आहे. डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितले होते की, ती फक्त दोन वर्षे जगेल. त्यामुळे लग्नानंतर थोड्याच काळात मधुबाला आणि किशोर कुमार यांना मोठा धक्का बसला होता.

दरम्यान, मधुबालाची बहीण मधूरने एका मुलाखतीत सांगितले होते की, किशोर कुमार यांनी तिला तिच्या मामाच्या घरी आणून सोडले होते. ती म्हणाली की, ते अनेकदा कामासाठी बाहेर फिरत असतात. अशा परिस्थितीत ते त्यांची चांगली काळजी घेऊ शकणार नाहीत.

किशोर कुमार यांनी शेवटच्या क्षणापर्यंत मधुबालाची काळजी घेतली. ते एक- दोन महिन्यांनी तिला भेटायला जायचे. ९ वर्षे सतत मधुबालाची काळजी घ्यायचे. दिवसेंदिवस तिची प्रकृती खालावत चालली होती. मधुबालाच्या नाकातून आणि तोंडातून रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या होत्या. शेवटी 23 फेब्रुवारी, 1969 रोजी मधुबालाने जगाचा अखेरचा निरोप घेतला होता.

अधिक वाचा- 
लवकरच येतोय… ‘भिंतीपलिकडचं जग’, जाणून घ्या मराठमोळ्या चित्रपटाबद्दल सर्वकाही
बोल्डनेसचा कहर! अनन्याच्या बिकिनी लूकने उडवली चाहत्यांची झोप

हे देखील वाचा