प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात त्याची शाळा ही खूप मोठी भूमिका निभावत असते. शाळा सर्वांनाच उत्तम संस्कार देते, चांगल्या सवयी लावते. मात्र आपण शाळेत असताना नक्कीच शाळेचा कंटाळा येतो, जेव्हा शाळा सोडून आपण बाहेर पडतो तेव्हाच घरी तिची किंमत आणि आपल्या आयुष्यातील तिची जागा लक्षात येते. कलाकारांच्या बाबतीत देखील असेच आहे. ते देखील या शाळेच्या भावनांना अपवाद नाही. अनेकदा कलाकार त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत त्यांच्या शाळेला भेट देतात आणि शालेय आठवणींना उजाळा देतात. ते सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्ससोबत देखील या आठवणी शेअर करत असतात. मराठी मनोरंजनाविश्वातील आघाडीची अभिनेत्री असलेल्या मधुराणी गोखले प्रभुलकर हिने देखील नुकतीच तिच्या शाळेला भेट दिली आणि याची माहिती सोशल मीडियावर दिली आहे.
View this post on Instagram
स्टार प्रवाहवरील अतिशय गाजणारी टॉपची मालिका म्हणजे ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या मधुराणीने तिच्या पुण्यातील शाळेला भेट दिली आहे. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या मधुराणीने यावेळी भरभरून बोलत सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. तिने तिच्या पोस्टमध्ये लिहिले, ” शालामाते, तुझेच सारे अगणित हे उपकार, वंदन सादर जिला सदाचे, त्रिवार जयजयकार, माझी शाळा , हुजुरपागा, पुणे. आज मी जे काही करतेय, करू शकतेय ते केवळ माझ्या शाळेमुळे. माझ्या शाळेने, शिक्षकांनी माझ्यातले कलागुण खऱ्या अर्थाने जोपासले, वेळोवेळी प्रोत्साहन दिलं. कलेवर , भाषेवर प्रेम करायला शिकवलं. शिस्त शिकवली. कणखरपणा शिकवला. आम्हा सगळ्या हुजूरपागेच्या कंन्याना, काल माझ्या batch च्या मैत्रिणींनी छानसा कार्यक्रम शाळेत ठेवला होता. त्या निमित्ताने खूप वर्षानी पुन्हा शाळेत जाणं झालं. त्या वास्तुला पुन्हा एकदा बिलगले…. किती वर्षे लहान झाले . भरून आलं.”
मधुराणी उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच उत्कृष्ट गायिका देखील आहे. ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमणावर सक्रिय असून सतत ती तिच्या व्यवसायिक आणि वैयक्तिक आयुष्याशी संबंधित पोस्ट शेअर करत फॅन्सच्या संपर्कात असते.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
खिलाडी कुमार आणि सिरिअल किसर पहिल्यांदाच एकत्र, पाहिलात का चित्रपटाचा ट्रेलर?
सुनील शेट्टीच्या दिलदार अंदाजाने जिंकले चाहत्यांचे मनं, मराठी भाषेत म्हणाला, ‘आम्ही सर्वजण…’