स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका चाहत्यांच्या मनावर चांगलीच वर्चस्व गाजवत आहे. मालिकेतील सगळेच पात्र खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. मालिकेत केवळ एका कोणत्याही पात्राला मध्यवर्ती न ठेवता सगळ्याचा पात्रांना समान महत्व दिले जात आहे. मालिकेत मधुराणी प्रभुलकर मुख्य भूमिकेत आहे. अशात मालिकेतील अरुंधतीचे पात्र साकारणारी मधुराणी सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. काय आहे नेमके प्रकरण? चला जाणून घेऊया…
अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने (madhurani prabhulkar) सोशल मीडियावर सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या पोस्टला चाहते भरभरून प्रतिसाद देत असतात. अनेकदा तिचे पोस्टमुळे ती चर्चेत येते. मालिकेतील तिच्या समंजस आणि विचार पात्राचे सर्वजण तोंडभरून कौतुक करतात. त्यामुळे सोशल मीडियावर तिचा चाहता वर्ग चांगलाच वाढला आहे.
सध्या मधुराणीचे फोटो व्हायरल होत आहे. त्यामध्ये ती ट्रिपचा आनंद घेत आहे. हा फोटो पाहूण चाहते एकापेक्षा एक भन्नाट कमेंट करत आहेत. एका युजरने लिहीले की, “अरुंधतीताई लवकर परत ये. समृद्धीमध्ये सारखा घोळ होत आहेत. तुझी इकडे खूप गरज आहे.” तर दुसऱ्याने लिहीले की, “ये बाई लवकर… इकडे देशमुखांच्या घरात नुसता गोंधळ चालू आहे.” तिसऱ्याने लिहिले की, “डिश चांगली आहे पण मधुराणी लवकर मालिकेत ये. तुझी खूप वाट पाहात आहोत.”
View this post on Instagram
दरम्यान, गेल्या काही दिवसांपुर्वी मधुराणी मालिकेतुन गायब झाल्याचे पाहायला दिसत आहे. ती ऑस्ट्रेलियाला तिच्या एका कार्यक्रमासाठी गेली. त्यामुळे तिचे चाहते तिची आठवण काढत आहेत. खऱ्या आयुष्यात ती ऑस्ट्रेलियामध्ये ट्रिपचा आनंद घेत आहे. या दरम्यान तिने तिचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. जे सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. (Actress Madhurani Prabhulkar’s ‘She’ post in discussion)
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
तापसीने पिवळ्या बिकिनीमध्ये समुद्रात मारली डुबकी; अभिनेत्रीचा थक्क करणारा व्हिडिओ एकदा पाहाच
190 कोटींच्या आलीशान घराबद्दल उर्वशीच्या आईने साेडले मौन; म्हणाल्या, ‘इंशाअल्लाह…’