Tuesday, June 18, 2024

तापसीने पिवळ्या बिकिनीमध्ये समुद्रात मारली डुबकी; अभिनेत्रीचा थक्क करणारा व्हिडिओ एकदा पाहाच

तापसी पन्नूची गणना चित्रपटसृष्टीतील यशस्वी अभिनेत्रींमध्ये केली जाते. तिने आतापर्यंत केलेल्या सर्व चित्रपटांमध्ये तिच्या अभिनयाचे कौतुक झाले आहे. एक प्रतिभावान अभिनेत्री असण्यासोबतच तापसी फॅशन स्टेटमेंटमध्येही कुणापेक्षा कमी नाही. अभिनेत्री अनेकदा तिचे बोल्ड आणि सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तापसी पन्नू कधी तिच्या चित्रपटांमुळे, तर कधी तिच्या वक्तव्यांमुळे, चर्चेत असते. अशात तापसी या सगळ्यांपासून दूर असून सुट्ट्याचा आनंद घेत आहे, ज्याचा व्हिडिओ साेशल मीडियावर तुफान व्हायरल हाेत आहे.

तापसी पन्नू (taapse pannu) हिला विविध ठिकाणी फिरायला फार आवडते. अशात सध्या अभिनेत्री मियामीमध्ये लाइफ एन्जॉय करत आहे आणि सुट्टयांचा आनंद घेत आहे. या साेबतच एक व्हिडिओही तिने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्यामध्ये तिचा मंत्रमुग्ध करणारे साैंदर्य दिसत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये तापसी कधी पिवळ्या बिकिनीमध्ये समुद्रात डुबकी मारताना दिसत आहे, तर कधी ती काळ्या मोनोकिनीमध्ये समुद्रकिनाऱ्यावर तिचा वेळ एन्जॉय करताना दिसत आहे. हा मियामी बीचचा व्हिडिओ आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Taapsee Pannu (@taapsee)

तापसी पन्नूचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर तिचा लूक आणि टोन्ड बॉडी पाहून चाहते हैराण झाले आहेत. अशात चाहते अभिनेत्रीच्या या व्हिडिओवर भन्नाट कमेंट करत आहेत. कुणी हॉट, तर कुणी फायर, इतकेच नव्हे तर कुणी हार्ट इमाेजी टाकून अभिनेत्रीवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

तापसी पन्नूचा बऱ्याच दिवसांपासून कोणताही चित्रपट आलेला नाही. तापसी शेवटची ‘ब्लर’ चित्रपटामध्ये दिसली हाेती, पण ताे OTT प्लॅटफॉर्म Zee5 वर प्रदर्शित झाला. तिच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये तिच्याकडे ‘हसीना दिलरुबा’चा सिक्वेल आणि ‘धक धक’ नावाचा चित्रपट आहे, जे पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्साही आहेत.(bollywood actress taapse pannu sizzles in bikini shares video from miami beach vacation)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
190 कोटींच्या आलीशान घराबद्दल उर्वशीच्या आईने साेडले मौन; म्हणाल्या, ‘इंशाअल्लाह…’

श्रीदेवी यांच्या आईला इंप्रेस करण्यासाठी बोनी कपूर यांनी मान्य केले होते ‘एवढे’ लाख रुपये

हे देखील वाचा