Monday, July 1, 2024

सहा वर्षांपूर्वी जिथं स्पर्धक म्हणून झिजवले पाय, तिथं स्पर्धकांना आपल्याच तालावर नाचवणार नोरा

कष्टाला पर्याय नाही, असे म्हणतात. तसेच, केलेल्या कष्टाचे फळही मिळतेच मिळते. हे बॉलिवूड कलाकारांनाही तंतोतंत लागू होते. आज आपण अनेक कलाकारांना कष्टाच्या जोरावर सुपरस्टार झाल्याचे पाहिले आहे. जसे की, कार्तिक आर्यन, राजकुमार राव, शाहरुख खान आणि असे बरेच कलाकार. यामध्ये एका अभिनेत्रीचाही समावेश आहे. सातासमुद्रापलीकडून आलेली ही अभिनेत्री ज्वलंत उदाहरण आहे. दीर्घ काळ संघर्ष आणि मेहनत केल्यानंतर आता ती त्याच शोचे परीक्षण करताना दिसणार आहे, ज्यामध्ये ती स्पर्धक म्हणून सामील झाली होती. ती अभिनेत्री इतर कुणी नसून नोरा फतेही ही आहे.

अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेही (Nora Fatehi) ही ५ वर्षांनंतर ‘झलक दिखला जा’ (Jhalak Dikhla Ja) या शोमध्ये पुनरागमन करत आहे. विशेष म्हणजे, यावेळी ती स्पर्धक नसून परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

तब्बल ६ वर्षांपूर्वी स्पर्धक होती नोरा फतेही
यशाच्या पायऱ्या चढताना भरपूर वेळा ठेच लागत असते. नोरा फतेहीच्या वाट्यालाही असे दिवस आले होते. तिने एक मोठा काळ संघर्ष केला होता. यादरम्यान ती अनेक रियॅलिटी शोमध्ये भाग घ्यायची. त्यापैकीच एक ‘झलक दिखला जा’ हा शो होता. सन २०१६ मध्ये नोरा फतेही या शोमध्ये स्पर्धक म्हणून सामील झाली होती. नोराला आधीपासूनच डान्सची आवड होती, त्यामुळे तिने या शोमध्ये भाग घेत शोची शोभा वाढवली. ‘झलक दिखला जा’ या शोमधून नोराला खूप प्रसिद्धी मिळाली होती. आता ६ वर्षांनंतर नोरा याच शोचे परीक्षण करताना दिसणार आहे. हे खास स्थान मिळवल्याने ती खूप खुश आणि भावूकही झाली आहे. सर्वाधिक आनंद याचा आहे की, ती प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) हिच्यासोबत शोचे परीक्षण करताना दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

माधुरी दीक्षित, करण जोहरही होणार सामील
नोरा फतेहीव्यतिरिक्त माधुरी आणि करण जोहर हेदेखील ‘झलक दिखला जा’ या शोचे परीक्षण करताना दिसणार आहेत. त्यामुळे नोरा खूपच खुश आहे. माधुरीने यापूर्वीही शोचे परीक्षण केले होते. दुसरीकडे, करण जोहरही रियॅलिटी शोचे परीक्षण करण्याची संधी सोडत नाही.

सध्या नोरा ‘डान्स दीवाने ज्युनिअर’ शोचे परीक्षण करत होती. या नवीन भूमिकेत ती पात्र ठरली आणि तिला सर्वांची पसंती मिळाली. कदाचित यामुळेच आता तिच्याशी ‘झलक दिखला जा’ या शोच्या निर्मात्यांनी संपर्क साधला आणि तिला शोमध्ये परीक्षक म्हणून सामील होण्याबाबत विचारले. अशात नोरानेही ही संधी दोन्ही हातांनी कवेत घेतली.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

भावा जरा दमानं! जास्तच रिव्हिलिंग ड्रेस घालून आलेली दिशा पटानी, मग शेजारी बसलेल्या व्यक्तीचेही सुटले नियंत्रण

काटा किर्रर्र! सर्वाधिक रोमान्सने भरलेले गाणे घेऊन आला खेसारी, अर्शीसोबतच्या केमिस्ट्रीने वेधले लक्ष

एकीकडे कोर्टाची नोटीस, तर दुसरीकडे कोरोनाची लागण; संकटात सापडले ‘हे’ दिग्दर्शक

हे देखील वाचा