Wednesday, February 5, 2025
Home बॉलीवूड ब्रेकिंग! माधुरी दीक्षितवर कोसळला दु:खाचा डोंगर, अभिनेत्रीच्या काळजाच्या जवळ असलेल्या व्यक्तीचे निधन

ब्रेकिंग! माधुरी दीक्षितवर कोसळला दु:खाचा डोंगर, अभिनेत्रीच्या काळजाच्या जवळ असलेल्या व्यक्तीचे निधन

कलाविश्वातून काळीज तोडणारी बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित हिची आई स्नेहलता दीक्षित यांचे निधन झाले. त्यांनी रविवारी (दि. 12 मार्च)ला सकाळी 8.40 वाजता अखेरचा श्वास घेतला. त्या 91 वर्षांच्या होत्या. ही माहिती माधुरीचे कौटुंबिक सहकारी रिक्कू राकेश नाथ यांनी दिली. या बातमीने कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.

रिक्कू राकेश नाथ यांनी सांगितले की, स्नेहलता दीक्षित (Snehlata Dixit) यांचे राहत्या घरी निधन झाले. तसेच, माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) हिनेदेखील आईच्या निधनाची दु:खद बातमी शेअर केली आहे. माधुरीने पोस्टमध्ये लिहिले की, “माझी प्रिय आई स्नेहलता दीक्षितचे आज सकाळी निधन झाले. तिच्यावर आज दुपारी 3 वाजता डॉ. ई मूसा रोड, जीजामाता नगर, वरळी मुंबईस्थित वैकुंठ धाममध्ये अंत्यसंस्कार होईल.”

माधुरी दीक्षित अनेकदा तिचे आईसोबत फाेटाे शेअर करून तिच्यावरचे प्रेम व्यक्त करत असे. अलीकडेच, जूनमध्ये अभिनेत्रीने तिच्या आईचे काही फोटो शेअर केले होते आणि तिला तिच्या 90 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. तिच्या आईसोबतच्या आठवणी शेअर करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, “वाढदिवसाच्या शुभेच्छा! आई ही मुलीची सर्वात चांगली मैत्रीण असते असे म्हणतात. ते अगदी बरोबर आहे. तू माझ्यासाठी केलेले सर्व काही, तू मला शिकवलेले धडे ही तू मला दिलेली सर्वात मोठी भेट आहे. मी तुला चांगले आरोग्य आणि आनंदायी आयुष्य लाभाे हिच प्रार्थना करते.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene)

माधुरीच्या करिअरच्या दिवसांमध्ये तिच्या आईने तिला खूप साथ दिली हाेती. चित्रपटाचे शूटिंग असो किंवा कोणताही कार्यक्रम असाे, तिची आई नेहमीच माधुरीसोबत असायची. अभिनेत्रीने अनेकदा सांगितले आहे की, स्टार असूनही सामान्य जीवन जगण्यात तिच्या आईचा मोठा हात आहे. तिच्या आईने नेहमीच तिला जमिनीवर राहायला शिकवले.(actress madhuri dixit mother snehlata dixit passed away funeral will be held in worli mumbai)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
एमसी स्टॅनच्या कॉन्सर्टमधे त्याला बघण्यासाठी लोकांनी केली तोबा गर्दी, गेट फोडून आत घुसण्याचा झाला प्रयत्न
ढसाढस रडत रडत खाली पडली राखी; युजर्स म्हणाले,’प्रिय राखी,…’

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा