‘देवमाणूस’ ही मराठी मालिका पाहिली का? असा प्रश्न विचारला, तर कदाचित सर्वांचेच उत्तर हो असे असेल. ‘देवमाणूस’ या मालिकेतील प्रत्येक पात्राचा आपला एक वेगळाच चाहतावर्ग आहे. यापैकीच एक ‘चंदा’ ही भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे माधुरी पवार होय. माधुरी टीव्हीवरील प्रसिद्ध ‘बिग बॉस मराठी’ या रियॅलिटी शोमध्येही झळकली होती. तसेच ती ‘अप्सरा आली’ या रियॅलिटी शोची विजेतीही आहे. रियॅलिटी शोनंतर तिला काम मिळणे कठीण झाल्याचे तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले.
तिच्यासोबत घडलेला एक अनुभव तिने सांगितला. ती म्हणाली की, “‘महाराष्ट्राचा सुपर डान्सर’ या रियॅलिटी शोमध्ये मी ऑडिशन दिले होते. हा लोकप्रिय शो होता. ऑडिशनमध्ये माझ्या डान्सने परीक्षकही प्रभावित झाले होते. माझ्याकडे सांगण्यासाठी कथा नव्हती, त्यामुळे मला सिलेक्ट केलं गेलं नाही. सध्या टीव्ही शो निर्माते प्रतिभेपेक्षा अशा कथांमागे का धावतात हे मला कळत नाही. या अशा खेळामुळे अनेकजण चांगल्या संधीपासून वंचित राहतात.”
“जेव्हा शो सुरू होता, तेव्हा मी २४-२४ तास काम करत होते. अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत होते. परंतु शो संपला त्यानंतर मला काम मिळणं फार कठीण झालं. टीव्ही रियॅलिटी शो चालू असताना प्रसिद्धी मिळते, पण अशा विजेत्यांना काम मिळत नाही. ही गोष्ट मला खरी वाटते, हा माझा अनुभव आहे. टीव्ही शो संपल्यानंतर दोन ते तीन महिन्यात प्रेक्षक आपल्याला विसरून जातात. मराठी टीव्हीवरील असे अनेक विजेते आहेत. पण ते आता कुठे आहेत? काय करतायेत? अनेकजण त्यापैकी कामाच्या शोधात असतील आणि हेच सध्याचं कटू सत्य आहे,” असंही पुढे ‘अप्सरा आली’ या रियॅलिटी शोची विजेती माधुरी म्हणाली.
अनेक कलाकारांप्रमाणे काम मिळत नसल्याने माधुरीदेखील नैराश्यात गेली होती. ती आपल्या नैराश्याबद्दल सांगताना म्हणाली की, “मला काहीच काम मिळत नव्हतं. मी नैराश्यात गेले होते. सोशल मीडियावर मी अधिकाधिक व्हिडिओ बनवू लागले होते. हीच गोष्ट नैराश्यातून बाहेर येण्यासाठी तिच्या कामी आली. एका रात्रीत मी सोशल मीडिया स्टार झाले.”
काम मिळत नसल्याने माधुरी नैराश्यात गेली होती. “मला काहीच काम मिळत नव्हतं. मी नैराश्यात गेले होते. सोशल मीडियावर मी अधिकाधिक व्हिडिओ बनवू लागले आणि नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी तेच माझ्या कामी आलं. रातोरात मी सोशल मीडिया स्टार झाले”, असं तिने सांगितलं. माधुरीने ‘देवमाणूस’ या मालिकेत चंदाची भूमिका साकारली. ही भूमिका छोटी असली तरी त्यामुळे तिला चांगली प्रसिद्धी मिळाली.
माधुरीबद्दल थोडक्यात
माधुरी पवारचा जन्म सातारा शहरात झाला आहे. तिने पुण्याच्या महाविद्यालयातून एमबीएची पदवी घेतली आहे. अगोदर पासूनच अभिनय व डान्सची आवड असलेल्या माधुरीला ‘टिक टॉक’मुळे अधिक लोकप्रियता मिळाली होती. तिचे अनेक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच धुमाकूळ घालत असतात. आपल्या आई- वडिलांच्या प्रोत्साहनामुळे ती डान्समध्ये पारंगत झाली. त्यामुळे तिच्या वडिलांनीच तिला डान्सचे धडे दिले होते. त्यातूनच तिने अनेक नृत्य स्पर्धा गाजवल्या होत्या.
हेही वाचा-