Video: बूस्टर डोस देणाऱ्या नर्सला धरम पाजींचा आशीर्वाद, हात जोडून चाहत्यांना केले ‘हे’ आवाहन

आपल्या दमदार अभिनयाने ३ दशकांहून अधिक काळ हिंदी सिनेसृष्टी गाजवणारे ‘ही मॅन’ म्हणजेच दिग्गज अभिनेते धर्मेंद्र. आपल्या चित्रपटांव्यतिरिक्त ‘धरम पाजी’ म्हणजेच धर्मेंद्र हे सोशल मीडियावरील त्यांच्या फोटो आणि व्हिडिओंमुळे कमालीचे चर्चेत असतात. त्यांच्या प्रत्येक पोस्टची चाहते आतुरतेने वाट पाहतात. अशातच त्यांनी आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे.

धर्मेंद्र (Dharmendra) यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ८६ वर्षांचे धर्मेंद्र कोरोना व्हायरसची लागण होऊ नये म्हणून बूस्टर डोस घेताना दिसत आहेत. या व्हिडिओत दिसते की, ते एका सोफ्यावर बसले आहेत आणि एक नर्स त्यांना बूस्टर डोस देत आहे.

या व्हिडिओत धर्मेंद्र म्हणतात की, “बूस्टर घेत आहे बूस्टर. सर्वांनी घेतला पाहिजे. देऊन टाका.” यानंतर नर्स त्यांना बूस्टर डोसची लस देते. पुढे धर्मेंद्र म्हणतात की, “घेऊन टाकलं. त्रासही नाही झाला काही. मास्क लावले पाहिजेत.”

View this post on Instagram

A post shared by Dharmendra Deol (@aapkadharam)

त्यांच्या या व्हिडिओला आतापर्यंत ३ लाख ५० हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच ५० हजारांहून अधिक लाईक्सचाही पाऊस व्हिडिओवर पडला आहे.

धर्मेंद्र यांनी नर्सला दिला आशीर्वाद
धर्मेंद्र बूस्टर डोस घेणाऱ्या नर्सच्या डोक्यावर हात ठेवून तिला आशीर्वाद देतात आणि आभारही मानतात. हा व्हिडिओ शेअर करून धर्मेंद्र यांनी लिहिले आहे की, “मित्रांनो, नम्र विनंती, कृपया बूस्टर डोस घ्या.” धर्मेंद्र यांच्या या पोस्टवर त्यांची मुलगी ईशा देओलने कमेंट करत लिहिले की, “लव्ह यू बाबा.” याव्यतिरिक्त त्यांचे चाहतेही त्यांच्या या पोस्टवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत त्यांना नेहमी तंदुरुस्त राहण्यास सांगत आहेत.

करण जोहरच्या सिनेमात झळकणार धर्मेंद्र
धर्मेंद्र सध्या मस्त आयुष्य जगत आहेत. ते अजूनही फिटनेसकडे तितकेच लक्ष देतात. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची माहिती ते आपल्या चाहत्यांना देतात. अलीकडेच ते ‘बिग बॉस’च्या सेटवरही पोहोचले होते, जिथे त्यांनी सलमान खानसोबत खूप मजा-मस्ती केली होती. धर्मेंद्र हे लवकरच करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात दिसणार आहेत.

धर्मेंद्र यांनी आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत ३०० हून अधिक चित्रपटात काम केले आहे. विशेष म्हणजे, त्यांनी १९६० ते १९६८ या काळात महिला केंद्रित चित्रपटांमध्ये रोमँटिक हिरोच्या भूमिका साकारल्या. त्यानंतर ते १९६८ ते ६९ मध्ये रोमँटिक नायक बनले. पुढे १९७१ ते १९९७ दरम्यान त्यांनी ऍक्शन हिरोच्या भूमिका साकारल्या. त्यांना बॉलिवूडमध्ये ‘गरम’ धरम म्हणूनही ओळखले जाते.

हेही वाचा-

Latest Post