Thursday, December 5, 2024
Home टेलिव्हिजन ‘दोनशे बिहारी आणून…’, म्हणत कूकने अभिनेत्री माही विजला दिली चाकू मारण्याची धमकी

‘दोनशे बिहारी आणून…’, म्हणत कूकने अभिनेत्री माही विजला दिली चाकू मारण्याची धमकी

कलाविश्वातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. अभिनेत्री माही विज हिने तिच्या कूकने जीवे मारण्याची धमकी दिल्याचे ट्वीट केले होते. आता हे ट्वीट व्हायरल होत आहेत. माहीने त्यात लिहिले होते की, तिच्याकडे व्हिडिओदेखील आहे. अशातच आता एका मुलाखतीत तिने संपूर्ण घटना सांगितली आहे.

अभिनेत्री माही विज (Mahhi Vij) हिने सांगितले की, कूक काही काळापासून तिच्याकडे काम करत होता. तिला समजले की, तो चोरीदेखील करत आहे. त्यावेळी तिचा पती आणि अभिनेता जय भानुशाली (Jay Bhanushali) जयने त्याचा हिशोब करायचे ठरवले, तेव्हा त्याने संपूर्ण महिन्याचा पगार मागू लागला. यावर चर्चा वाढली आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. माहीने सांगितले की, तिला आपली नाही, तर मुलीची काळजी आहे.

दारू पिऊन दिल्या शिव्या
माध्यमांतील वृत्तानुसार, माही विज हिने सांगितले की, तिच्या नानीने तिला कूकबाबत सावध केले होते. माहीने पुढे सांगितले की, “तीन दिवसच झाले होते आणि आम्हाला त्याच्या चोरीबाबत सांगण्यात आले. मी जयला सांगण्याची वाट पाहत होती. जेव्हा जय आला, तेव्हा तो हिशोब करू पाहत होता. मात्र, त्याला संपूर्ण महिन्याचा पगार हवा होता. जेव्हा जयने त्याला कारण सांगितले, तर म्हणाला की, ‘२०० बिहारी इथे उभे करेल.’ तो दारू पिऊन आम्हाला शिव्या देऊ लागला. आम्ही पोलिसांकडेही गेलो.”

कुटुंबाच्या सुरक्षिततेची वाटते भिती
माहीने सांगितले की, तो माणूस तिला फोन करून धमकावत होता. माहीने सांगितले की, त्यांच्याकडे रेकॉर्डिंगही आहे. ती म्हणाली की, “आजूबाजूला जे काही चालले आहे, ते बघून मला भीती वाटते. जर त्याने खरोखरच मला चाकू खुपसला तर? मला काही झाले, तर लोक नंतर विरोध करतील, त्याचा काय उपयोग. मला माझ्या कुटुंबाच्या सुरक्षिततेची भीती वाटते.” माही म्हणाली, “मी ऐकले आहे की, तो जामीन घेऊन बाहेर येणार आहे. तुरुंगातून सुटून तो आपल्या कुटुंबावर किंवा आपल्या मुलीचा बदला घेईल अशी भीती तिला वाटते.

माहीच्या कामाबाबत बोलायचं झालं, तर तिने ‘लागी तुझसे लगन’, ‘लाल इश्क’, ‘बालिका वधू’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा