बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही दररोज या ना त्या कारणामुळे चर्चेचा विषय ठरत आहे. कधी ती अरबाज खान याच्यासोबत विमानतळावर स्पॉट झाल्यामुळे, तर कधी अर्जुन कपूर याच्याबद्दलच्या वक्तव्यामुळे. यावेळी तिचे चर्चेत येण्यामागील कारण जरा वेगळे आहे. ‘छैया छैया गर्ल’ या नावाने ओळखली जाणारी मलायका अरोरा नोरा फतेही हिच्यासोबतच्या डान्समुळे सर्वांचे लक्ष वेधत आहे. ‘मूव्हिंग इन विथ मलायका’ या मलायकाच्या शोमध्ये दोघींचाही डान्स परफॉर्मन्स पाहायला मिळणार आहे. यादरम्यानचा दोघींचाही छोटासा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मलायका आणि नोराच्या सिझलिंग अंदाजावरून नजर हटवणे चाहत्यांना कठीण जात आहे.
नोरा आणि मलायकामध्ये महासंग्राम
मलायका अरोरा आणि नोरा फतेही (Malaika Arora And Nora Fatehi) यांच्या डान्स मूव्हज पाहून चाहत्यांच्याही भुवया उंचावल्या आहेत. दोघीही एकमेकींवर भारी पडताना दिसत आहेत. मोकळे केस आणि काळ्या रंगातील ड्रेसमध्ये या दोघीही खूपच ग्लॅमरस दिसत आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहत्यांनीही एकापेक्षा एक कमेंट्स केल्या आहेत. मलायकाच्या शोचा प्रोमो शेअर करत डिज्नी हॉटस्टार प्लसने इंस्टाग्रामवर कॅप्शन देत लिहिले की, “मलायका आणि नोराचा ड्रीम कोलॅब फक्त आणि फक्त मूव्हिंग इन विथ मलायकाच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये.”
View this post on Instagram
नोरा फतेही- मलायका अरोराच्या सिझलिंग डान्स परफॉर्मन्सवर कमेंट्स
मलायका अरोराचा डान्स पाहून चाहत्यांनी हटके कमेंट केल्या आहेत. एकाने कमेंट करत लिहिले आहे की, “पाण्याची बादली तयार ठेवा कारण आता इंस्टावर आग लागणार आहे.” दुसऱ्या एकाने कमेंट करत लिहिले की, “नोरा नोरा तूच भारी आहेस.” एकाने ट्रोल करत लिहिले की, “हा काय मुजरा सुरूये यार.”
मलायकाबद्दल बोलायचं झालं, तर तिने आतापर्यंत अनेक सिनेमात आपल्या डान्सचा जलवा दाखवला आहे. तिच्या सिनेमांमध्ये ‘दिल से’, ‘दबंग’, ‘वेलकम’, ‘हॅप्पी न्यू ईअर’, ‘दबंग 2’, ‘गब्बर सिंग’ यांचा समावेश आहे.
दुसरीकडे नोराबद्दल बोलायचं झालं, तर नोरानेही अनेक सिनेमात आपल्या डान्सने आग लावली आहे. तिने ‘सत्यमेव जयते’, ‘भुज’, ‘स्ट्रीट डान्सर 3डी’, ‘मरजावां’ यांसारख्या सिनेमात अभिनय आणि डान्स केला आहे. (actress malaika arora and nora fatehi face off video on chhaiyan chhaiyan song see here)
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
‘कांतारा 2’वर काम सुरू करण्यापूर्वी रिषभ शेट्टीने घेतले ‘या’ देवाचे दर्शन, परवानगीही मिळाली
आईची कुशी असेल, तर उशीची काय गरज! हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळताच प्रसिद्ध गायकाने आईसोबतचा फोटो केला शेअर