डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला बॉलिवूड गायक जुबिन नौटियाल याचा त्याच्याच राहत्या घरात अपघात झाला होता. खरं तर, तो घरातील पायऱ्यांवरून पडला होता. त्यामध्ये त्याच्या कोपराला आणि बरगड्यांना जबर दुखापत झाली होती. तसेच, डोक्यालाही मार बसला होता. या अपघातानंतर गायकाला मुंबईच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्याच्या उजव्या हातावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तसेच, हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झाल्यानंतर गायक त्याच्या गावाकडे गेला होता. अशात जुबिन नौटियालने लेटेस्ट फोटो शेअर केला आहे.
जुबिन नौटियालने आईसोबतचा फोटो केला शेअर
जुबिन नौटियाल इंस्टाग्राम (Jubin Nautiyal Instagram) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चांगलाच सक्रिय असतो. अशात त्याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झाल्यानंतरचा पहिला फोटो शेअर केला आहे. या फोटोत जुबिन त्याच्या आईच्या कुशीत झोपलेला दिसत आहे. त्याच्या कोपराच्या दुखापतीचे निशाणही दिसत आहेत. आईसोबतचा हा फोटो शेअर करत जुबिनने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “ऍन अर्ली डोज ऑफ विटामिन मॉम.” चाहत्यांनी गायकाच्या या पोस्टवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.
View this post on Instagram
जुबिन याने हॉस्पिटलच्या बेडवरून शेअर केला होता फोटो
यापूर्वी गायकाने हॉस्पिटलच्या बेडवरील आपला फोटो शेअर केला होता. तसेच, त्याच्या चाहत्यांना त्याच्या तब्येतीविषयी माहिती दिली होती. गायकाने हा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “तुम्हा सर्वांच्या प्रार्थनांसाठी धन्यवाद. परमेश्वराचे लक्ष माझ्यावर होते आणि त्यांनीच मला या घातक अपघातातून वाचवले. मला डिस्चार्ज मिळाला आहे आणि मी ठीक आहे. तुमच्या कधीच न संपणाऱ्या प्रेमासाठी आणि प्रार्थनासाठी धन्यवाद.”
View this post on Instagram
जुबिनच्या कामाविषयी थोडक्यात
जुबिनच्या कामाविषयी बोलायचं झालं, तर त्याने अनेक हिट गाणी दिली आहेत. त्याच्या गाण्यांमध्ये ‘लुट गये’, ‘हमनवा मेरे’, ‘तुझे कितना चाहने लगे हम’, ‘तुम ही आना’, ‘बेवफा तेरा मासूम चेहरा’, ‘तो आयेंगे हम’ आणि ‘गजब का है दिन’ यांसारख्या प्रसिद्ध गाण्यांचा समावेश आहे. त्याने भारतीय संगीत विश्वातील प्रसिद्ध गायकांमध्ये स्वत:ची ओळख बनवली आहे. (singer jubin nautiyal was seen lying on his mother lap after being discharged from the hospital see photo)
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
‘लोक आपला वेळ विसरतात…’, म्हणत यशपाल यांनी नवाजुद्दीन सिद्दीकीवर व्यक्त केला संताप
‘खाटाखाली चप्पल शोधत आहेस का..?’ ‘बेशरम रंग’ गाण्यावर चोरीचा आरोप तर ट्रोलर्सने दीपिकाची घेतली शाळा