Wednesday, July 2, 2025
Home बॉलीवूड रँपवॉक करतोय अर्जुन, पण लक्ष वेधलं प्रेक्षकांमध्ये बसलेल्या मलायकाने, कॅमेऱ्यात कैद झाला क्षण

रँपवॉक करतोय अर्जुन, पण लक्ष वेधलं प्रेक्षकांमध्ये बसलेल्या मलायकाने, कॅमेऱ्यात कैद झाला क्षण

बॉलिवूडमधील रोमँटिक जोडप्यांमध्ये अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर यांची गणना होते. त्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते रांग लावत असतात. हे जोडपे नेहमीच एकमेकांना पाठिंबा देताना दिसत असतात. दोघेही कधीच एकमेकांवर प्रेम व्यक्त करण्याची एकही संधी सोडत नाहीत. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करून हे दोघे एकमेकांवरील प्रेम व्यक्त करतात. शनिवारी (दि. ३० जुलै) फॅशन डिझायनर कुणाल रावल याच्या फॅशन शोसाठी अर्जुन कपूरनेही हजेरी लावली होती. या शोमध्ये मलायकाने ज्या प्रकारे अर्जुनला प्रोत्साहित केले, ते पाहण्यासारखे होते.

अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) हा स्टायलिश अंदाजात रँपवर चालताना दिसला. दुसरीकडे, त्याची गर्लफ्रेंड मलायका अरोरा (Malaika Arora) ही प्रेक्षकांमध्ये बसून त्याचा आत्मविश्वास वाढवताना दिसली. यावेळी अर्जुनने तिला फ्लाईंग किस (Arjun Kapoor Flying Kiss) दिली.

 

View this post on Instagram

 

A post shared by @varindertchawla

शोमध्ये रँपवर जेव्हा अर्जुन कपूर उतरला, तेव्हा नजारा पाहण्यासारखा होता. आपल्या स्वॅगमध्ये चालत त्याने प्रेक्षकांचे मन जिंकले. दुसरीकडे, मलायकाही त्याच्यासाठी टाळ्या वाजवताना दिसली. मलायकाचा हा अंदाज चाहत्यांनाही भलताच आवडला. बॉयफ्रेंडला पाठिंबा देण्यासाठी आलेली मलायका स्वत:ही स्टायलिश अंदाजात पोहोचली होती. तिने गोल्डन स्कर्ट आणि ब्रालेटसह मॅचिंग ब्लेझरही परिधान केले होते. मोकळे केस, हाय हील्स आणि ग्लोईंग मेकअपसह मलायका एकदम सुंदर दिसत होती. उपस्थितांमध्ये मलायकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

Malaika-Arora-Insta-Post
Photo Courtesy Instagrammalaikaaroraofficial

मलायकाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरवरही अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. यामध्ये ती मस्ती करताना आणि मित्रांसोबत पोझ देताना दिसत आहेत. डिझायनर गौरव गुप्ता याच्यासोबत काढलेले फोटोही मलायकाने शेअर केले आहेत. याव्यतिरिक्त मलायकानेही फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमधील तिचा शानदार लूक पाहायला मिळत आहे.

Malaika-Arora-Insta-Post
Photo Courtesy Instagrammalaikaaroraofficial

मलायका आणि अर्जुन यांनी एप्रिल २०१९मध्ये आपल्या रिलेशनशिपवर शिक्कामोर्तब केले होते. त्यानंतर चाहते आता त्यांच्या लग्नाची वाट पाहत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
टॉपलेस फोटोशूट ते दिग्दर्शकासोबतचा वाद, ‘या’ कारणांमुळे वादात सापडली होती ‘बर्थडे गर्ल’ कियारा
ब्रेकींग! ‘या’ प्रसिद्ध गायिकेचे निधन, हृद्य विकाराच्या झटक्याने मध्यरात्री घेतला अखेरचा श्वास
कायद्याच्या कचाट्यात अडकला अक्षय कुमारचा ‘रामसेतू’ चित्रपट, घटना चुकीच्या पद्धतीने दाखविल्याचा आरोप

हे देखील वाचा