बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही नेहमीच तिच्या भन्नाट लूक्सने चाहत्यांच्या काळजात घंटी वाजवत असते. ती सध्या सिनेमात जरी काम करत नसली, तरी लाईमलाईटमध्ये कसे राहायचे, हे तिला चांगलेच माहिती आहे. मलायका सोशल मीडियावरही तुफान सक्रिय असते. मलायकाचा नवीन लूक पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर असतात. आता मलायकाचा असाच एक लूक समोर आला आहे, जो पाहून सगळेच कोड्यात पडले आहेत. खरं तर मलायका न्यूड रंगाच्या लूकमध्ये घरातून बाहेर पडताना दिसते आणि सगळ्यांना ती तिच्या बोल्ड अंदाजाकडे हक्केबक्के करून सोडते.
मलायकाचा नवीन लूक
मलायका अरोरा (Malaika Arora) हिचे खूप सारे व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात तिला न्यूड रंगाच्या स्किन फिट आऊटफिट्समध्ये पाहून लोक हैराण झाले आहेत. खरं तर मलायकाची झलक पाहून असे वाटत नाही की, तिच्या अंगावर कोणताही कपडा आहे. यादरम्यान अभिनेत्रीने तिचा लूक डेनिम जॅकेटने पूर्ण केला आहे.
‘काकां’ची रिऍक्शन व्हायरल
दरम्यान, मलायकाचा असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तिच्या मागे उभ्या असलेल्या एका व्यक्तीने मलायकापेक्षा जास्त आपल्याकडेच सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मलायकाचा बोल्ड लूक पाहून तो व्यक्तीही आश्चर्यचकित झाले आहेत. यादरम्यान तो व्यक्ती मलायकाला अतिशय लक्ष देऊन पाहताना दिसत आहे. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
मलायकावरून नजरच हटेना
व्हिडिओ पाहिल्यानंतर या व्यक्तीची प्रतिक्रिया पाहून सगळ्यांनाच हसू आवरता येत नाहीये. कमेंट बॉक्समध्ये नेटकरी फक्त या व्यक्तीबाबत चर्चा करत आहेत. एकाने म्हटलं की, “माझ्याव्यतिरिक्त आणखी कोण मागे उभ्या असलेल्या आजोबांना बघत आहे.” आणखी एकजण कमेंट करत म्हणाला की, “काका ओ काका.” यासोबतच हा व्हिडिओ पाहिल्यानंतर हे स्पष्ट झाले आहे की, मलायकाचा हा लूक पाहिल्यानंतर ज्यानेही तिला घराबाहेर पाहिले, तो फक्त पाहतच राहिला.
वयाच्या ४८व्या वर्षीही फिटनेस कायम
मलायका अरोरा ही त्या बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक आहे, जी त्यांच्या सुंदरतेसोबतच फिटनेस आणि हॉटनेसमुळे ओळखल्या जातात. यामुळेच तिच्या चाहत्यांची संख्या आज कोटींच्या घरात आहे. ती नुकतेच बॉयफ्रेंड अर्जुन कपूर याच्यासोबत त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी फ्रान्सला गेली होती. तिथूनही त्यांनी अनेक फोटो शेअर केले.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
ऋषी कपूर यांच्या ‘त्या’ गोष्टीला प्रभावित होऊन तापसी पन्नूने केले १०० साऊथ सिनेमे साईन
‘कोका कोला बोलबम’ गाणं चांगलंच गाजतंय, फक्त ११ दिवसाच्या आतच गाठला ‘कोटी’ इतक्या व्ह्यूजचा टप्पा
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने अभिनय क्षेत्राला ठोकला रामराम? गावाकडे करतेय शेती