हिंदी सिने जगतात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या त्यांच्या चित्रपटातील अभिनयापेक्षा सोशल मीडिया पोस्टमुळेच नेहमी चर्चेत येत असतात. या यादीत बॉलिवूडची हॉटबाला मलायका अरोराचे (Malaika Arora) नाव पहिल्यांदा घेतले जाते. आपल्या बोल्ड अदांनी आणि फिगरने मलायका नेहमीच सर्वांचे लक्ष वेधत असते. तिच्या प्रत्येक पोस्टवर तिचे चाहते जोरदार प्रतिक्रिया देत असतात. सध्या मलायकाचे असेच काही बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत ज्यामधील तिच्या हॉटनेसने नेटकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकवला आहे.
अभिनेत्री मलायका अरोरा भलेही चित्रपटांपासून दुर असेल पण ती सोशल मीडियावर मात्र नेहमीच चर्चेत असते. आपले बोल्ड फोटो ती नेहमीच शेअर करत असते. सध्या तिच्या अशाच हॉट फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या फोटोंमध्ये अभिनेत्री बॅकलेस ड्रेसमध्ये खूपच स्टायलिश असण्यासोबतच सुंदर दिसत आहे. फोटोंमध्ये, मलायकाने हलका मेकअप निवडून तिचे केस मोकळे ठेवले आहेत. ज्यामुळे तिचा लूक आणखी आकर्षक होत आहे. मलायकाचे हे फोटो इंस्टाग्रामवर येऊन अवघी काही मिनिटे झाली आहेत, पण फोटो पाहताच हजारो लोकांनी या फोटोंना लाईक केले आहे.
तिच्या चाहत्यांनीही फोटोंवर कमेंट करून त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत आणि तिच्या लूकची जोरदार प्रशंसा करत आहेत. एका चाहत्याने तिच्या फोटोंवर कमेंट करत मलायका या वयातही बोल्ड दिसत असल्याचे लिहले आहे तर आणखी एकाने दुसऱ्या एका चाहत्याने तुझ्या लुकने मन जिंकले म्हणत मलायकाचे कौतुक केले आहे. दरम्यान मलायकाने सोशल मीडियावर तिच्या फोटो आणि व्हिडिओंद्वारे लोकांचे लक्ष वेधण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही ती तिच्या व्हायरल फोटोंमुळे चांगलीच चर्चेत आली आहे.
हेही वाचा –
निळू फुले ते राजशेखर, ‘या’ कलाकारांनी आपल्या खलनायकी भूमिकेने गाजवली मराठी सिनेसृष्टी
मुसेवाला हत्या प्रकरणाची जबाबदारी घेणारा अन् सलमानला धमकी देणारा लॉरेन्स बिश्नोई आहे तरी कोण?