Tuesday, June 24, 2025
Home बॉलीवूड शॉर्ट्स-क्रॉप टॉपमध्‍ये मलायका अरोराचा जबरदस्त समर लूक, चाहते म्हणाले ‘तू एकदम पांढरी व्हॅनिला आईस्क्रीम…’

शॉर्ट्स-क्रॉप टॉपमध्‍ये मलायका अरोराचा जबरदस्त समर लूक, चाहते म्हणाले ‘तू एकदम पांढरी व्हॅनिला आईस्क्रीम…’

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या अभिनयासोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. त्याचबरोबर मलायका सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांबरोबर शेअर करत असते. त्यासह मलायका नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल उघडपणे बोलत असते. मलायकाच्या प्रत्येक पोस्टला चाहत्यांची पसंती मिळते. मलायकाने या वयात ज्या प्रकारे स्वत:ला तंदुरुस्त ठेवलं आहे, त्यातून चाहत्यांना खूप प्रेरणा मिळते. त्यासह मलायका ही बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक आहे, जिची आलिशान आणि स्टायलिश लाईस्टाईल नेहमीच चर्चेत असते. मलायका अनेकदा फोटोंच्या माध्यमातून चाहत्यांचे होश उडवते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांशी जोडलेली असते. नुकताच मलायकाने स्वतःचा असा एक फोटो शेअर केला आहे, जो चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.

मलायकाचा फोटो होतोय व्हायरल

आपल्या फॅशन गेमने चाहत्यांना आकर्षित करणाऱ्या मलायकाने (Malaika Arora) पांढऱ्या प्लेन शॉर्ट्स आणि क्रॉप टॉपमध्ये एक फोटो शेअर केला आहे. यासोबत तिने गोल्डन मणी लावलेले फ्लॅट कॅरी केले आहेत. मलायकाने ब्लॅक बॅग आणि ब्लॅक बेल्टसह तिचा लूक पूर्ण केला आहे. केस मोकळे ठेवून आणि काळ्या रंगाचे शेड्स लावले आहेत. या फोटोसोबत मजेशीर कॅप्शन देत तिने लिहिले की, “आता खरा उन्हाळा आला.” मलायका किती आनंदी आणि समाधानी आहे हे तिच्या चेहऱ्यावरचे हास्य सांगत आहे. मलायकाचा हा फोटो परदेशातील आहे, जिथे ती व्हेकेशनसाठी गेली होती.

मलायकाचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. एका चाहत्याने तिला सांगितले की, “तू एकदम पांढरी व्हॅनिला आईस्क्रीम दिसत आहेस.” दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले की, “तुझा लूक सर्वोत्तम आहे. उन्हाळ्यासाठी सर्वोत्तम आहे.” मलायकाच्या या फोटोला आतापर्यंत एक लाखाहून अधिक लाईक्स आले आहेत. तिचा बिनधास्त अंदाज चाहत्यांना खूप आवडतो.

केवळ फॅशन सेन्सच नाही, तर मलायका तिच्या फिटनेसबाबतही खूप जागरूक आहे. ती निरोगी जीवनशैलीसाठी अनेक आरोग्यदायी नियमांचे पालन करते. तेव्हा ती स्वतःला सांभाळू शकते. आजही मलायका तिच्या सुपर सिझलिंग लूक्सने अनेक अभिनेत्रींना टक्कर देते. अभिनेत्रीचे बोल्ड लूकमधील फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर चर्चेत आहेत.

मलायका अरोरा आणि अरबाज खानचा २०१७ मध्ये झाला घटस्फोट 

मलायका आणि अरबाज १९९८ मध्ये विवाहबंधनात अडकले होते. २०१७ मध्ये त्यांनी अधिकृतपणे एकमेकांना घटस्फोट दिला. हे जोडपे आता १९ वर्षांच्या अरहान खानच्या मुलाचे पालक आहेत.

अर्जुन कपूरला करतेय डेट

विशेष म्हणजे मलायका अरोरा सध्या बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरला (Arjun Kapoor) डेट करत आहे. दोघे अनेकदा एकत्र हँग आउट करताना दिसले आहेत. चाहते अर्जुन आणि मलायकाच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र दोघांनीही त्यांच्या लग्नाबाबत अद्याप काहीही बोललेले नाही.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा – 

 

 

हे देखील वाचा