Saturday, April 12, 2025
Home साऊथ सिनेमा त्यामुळे माझा पूर्ण दिवस खराब जातो ! सोशल मिडीयावरच्या ट्रोलिंग विषयी बोलली मलाईका अरोरा…

त्यामुळे माझा पूर्ण दिवस खराब जातो ! सोशल मिडीयावरच्या ट्रोलिंग विषयी बोलली मलाईका अरोरा…

मलाईका अरोरा नेहमीच तिच्या पर्सनल अथवा प्रोफेशनल जीवनामुळे चर्चेत असते. मागील काही काळापासून मलाईका तिच्या आणि अर्जुन कपूरच्या ब्रेकअपच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. तिच्या सोशल मिडिया पोस्ट वर नेहमीच चांगल्या वाईट प्रतिक्रिया येत असतात. या अशा प्रतिक्रियांविषयीच मलाईका अरोरा सध्या बोलली आहे. 

सोशल मिडीयावर चालणाऱ्या ट्रोलिंग विषयी मलाईका म्हणते, जेव्हा कुणी म्हणतं की तुम्ही या वयातही सुंदर दिसता, तेव्हा मला खरंच छान वाटतं. मला नाही वाटत की कुणी हे उगाच म्हणत असेल. मी केलेल्या मेहनतीची हि मला मिळत असलेली पोचपावती आहे. 

मलाईका पुढे म्हणाली, पण हेच जेव्हा उलट होतं तेव्हा अवघड होऊन जातं. जेव्हा कुणी चुकीच्या भाषेत कमेंट करतो तेव्हा ते वाचून माझा संपूर्ण दिवस खराब होऊन जातो. पण आता मी हि गोष्ट बदलण्याचा हळूहळू प्रयत्न करते आहे. अशावेळी मला मानसिकरित्या मजबूत राहावं लागतं. त्यासाठी मी योग आणि ध्यान करते आणि या सगळ्या गोष्टींवर दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करते.याव्यतिरिक्त मी रिट्रीट मध्ये भाग घेते आणि वेळेवर जेवण करते. 

मलाईकाने यावेळी टेलर स्वीफ्टची प्रशंसा केली आहे. ती म्हणते कि, टेलर स्विफ्ट कमी वयात एवढा पैसा कमावते आहे. एवढी गर्दी जमा करते आहे हि नक्कीच खूप मोठी गोष्ट आहे. मी जेव्हा तिच्या वयाची होते तेव्हा मला हेच कळत नव्हतं की मला करायचं काय आहे   

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा – 

तुमची घाणेरडी ॲक्टिंग मला दाखवू नका… जान्हवी किल्लेकरचा वर्षा ताईंवर जोरदार मारा…

हे देखील वाचा