Sunday, September 8, 2024
Home टेलिव्हिजन तुमची घाणेरडी ॲक्टिंग मला दाखवू नका… जान्हवी किल्लेकरचा वर्षा ताईंवर जोरदार मारा…

तुमची घाणेरडी ॲक्टिंग मला दाखवू नका… जान्हवी किल्लेकरचा वर्षा ताईंवर जोरदार मारा…

अगदी सुरु झाल्यापासून बिग बॉस मराठीच्या नव्या पर्वाची चर्चा आहे. घरात प्रत्येक दिवशी काही काहीना काही वाद घडताना बघायला मिळत आहेत. कालच्या कल्ला टीव्ही मध्ये घरातल्या सगळ्या सदस्यांचे परर्फोर्मन्स बघायला मिळाले. पण यानंतर वर्षा उसगावकर आणि जान्हवी किल्लेकर यांच्यात जोरदार भांडण झाले. यावेळी वर्षा ताईंशी भांडताना मात्र जान्हवीने मर्यादा ओलांडल्या आहेत. 

घरात असताना सार्वजन गार्डन मध्ये बसले होते. जान्हवी तेव्हा आर्याला उद्देशून निर्लज्ज म्हणाली. तेव्हा वर्षा ताई दुसर्या ग्रुप सोबत बाजूला बसल्या होत्या. त्यावेळी त्या म्हणाल्या निर्लज्जम समर्पयामी! हे ऐकल्यानंतर जान्हवी संतापली आणि वर्षा ताईंना म्हणाली, ताई मी तुमचा दिवसापासून रीसपेक्ट करत आली आहे. माझ्या नादी लागू नका. पोरं बसतात तिथे तुम्ही केस उडवत येता. तुमची घाणेरडी ॲक्टिंग मला दाखवू नका !

जान्हवी असं बोलत असताना वर्षा ताईंनी तिला प्रत्युत्तर दिलं.मी इथे १०० दिवस टिकणार नंतर बाहेर पडणार. फालतू गोष्टींना मी दुर्लक्ष करते. काय तुझी गलिच्छ भाषा आहे. याच ॲक्टिंग मुळे मला राज्य शासनाचा पुरस्कार मिळालाय. तोही तीन वेळा. 

यावर जान्हवीने उत्तर दिलं की, तुम्हाला पुरस्कार देणाऱ्या लोकांना आज पश्चात्ताप होत असेल. कि आपण कुणाला पुरस्कार दिला म्हणून. वाद वाढताना बघून अंकिताने मध्यस्थी करत भांडण शांत करण्याचा प्रयत्न केला, तू त्यांच्या ॲक्टिंग बद्दल बोलू नकोस. हा वाद पुढेही असाच चालू राहिला.. आता घरात अजून कोणकोणते धमाके होतात हे बघावं लागेल. 

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा – 

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन! अभिनेते प्रशांत दामले यांनी व्यक्त केल्या भावना…

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा