Saturday, January 17, 2026
Home बॉलीवूड मलायका अरोराला घ्यायचीय मुलगी दत्तक; म्हणाली, ‘मला मुलगी असती, तर…’

मलायका अरोराला घ्यायचीय मुलगी दत्तक; म्हणाली, ‘मला मुलगी असती, तर…’

सेलिब्रिटींनी एखादे मूल दत्तक घेणे हे नवीन नाही. बॉलिवूडमध्ये असे काही कलाकार आहेत, ज्यांनी मुलांना दत्तक घेतले आहे. अशीच एक इच्छा अभिनेत्री मलायका अरोराने व्यक्त केली आहे. मलायकाला मुलगी दत्तक घेण्याची इच्छा आहे. तिला एक मुलगी दत्तक घेऊन त्या मुलीला कुटुंब द्यायचे आहे. मलायका तिचा मुलगा अरहानसोबत याबाबत चर्चा करत असते.

मलायका म्हणते की, “जर मला ही मुलगी असती, तर मी तिला एक कुटुंब दिले असते.” ती तिचा मुलगा अरहानवर खूप प्रेम करते, पण तिला मुलगी दत्तक घेण्याची इच्छा आहे. अरहान हा मलायका अरोरा आणि तिचा पूर्वाश्रमीचा पती अरबाज खान यांचा मुलगा आहे. अरबाज आणि मलायकाचा २०१७ मध्ये घटस्फोट झाला आहे. (Actress Malaika Arora wants to adopt daughter, expressed desire)

त्याचबरोबर मलायका म्हणाली की, “तिच्या अनेक मित्रांनी मुलांना दत्तक घेतले आहे. मुलं आपल्या जीवनात आनंद घेऊन येतात.” मलायका मुलगा अरहानसोबत अनेक गोष्टींवर चर्चा देखील करत असते, ज्यामध्ये मुलगी दत्तक घेण्याचा ही विषय चर्चेत आहे. ती म्हणाली की, “मी मुलासोबत मुलगी दत्तक घेण्याच्या विषयावर चर्चा करत असते.” परंतु तिने पुढे असेही सांगितले की, सध्या तरी त्यांची अशी कोणतीही योजना नाही.

मलायका पुढे असे ही म्हणाली की, “ती अशा कुटुंबातून येते जिथे मुलींची संख्या आहे, पण आता तिला एका मुलीची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे तिला मुलगी दत्तक घ्यायचे आहे.” मलायका म्हणाली की, “मुलीला दत्तक घेण्याची माझी मनापासून खूप इच्छा आहे. मी माझा मुलगा अरहानशी याबद्दल चर्चा करत आहे. माझी एक बहीण आहे, ज्यांच्यासोबत मी सर्वकाही शेअर करते. माझी इच्छा आहे की, जर मला मुलगी झाली असती, तर मी तिला तयार केले असते.”

मलायका अरोरा अभिनेत्री करीना कपूरने होस्ट केलेल्या कार्यक्रमामध्ये अरबाज खानपासून घटस्फोट घेतल्यानंतर अरहानच्या प्रतिक्रियाबद्दल बोलली आहे. ती म्हणाली की, “मला माझ्या मुलाला आनंदी वातावरणात वाढताना बघायचे आहे. कालांतराने माझा मुलगा अधिक स्वीकार करणारा आणि आनंदी आहे. तेच तुम्ही पाहू शकतो की, आम्ही दोघेही एक व्यक्ती म्हणून लग्न बंधनापेक्षा खूप आनंदी आहोत. मला अरहान एके दिवशी म्हणाला की, आई, तुला आनंदी आणि हसताना पाहून छान वाटले.”

अभिनेत्री मलायका अरोरा ही सध्या चित्रपटात जास्त दिसून येत नसली, तरीही ती कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत असते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

स्टाईल आयकॉन बनत आहे सचिन पिळगावकरची लाडकी लेक; पाहा श्रियाचा हा ‘हटके’ अंदाज

-अभिनेत्री हंसिका मोटवानीने मालदीवमधून बिकिनी फोटो शेअर करत लावली सोशल मीडियावर आग

‘तू रंग है मेरा…’, म्हणत भाग्यश्री मोटेच्या लेटेस्ट फोटोने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

हे देखील वाचा