Friday, December 1, 2023

फोटोतील ‘या’ मुलीला ओळखल का? आज करतीये मराठी सिनेसृष्टीवर राज्य

सध्यातच्या काळात कधी काय व्हायरल होईल ते सांगता येत नाही. सोशल मीडियावर तर सतत काही ना काही व्हायरल होत असते. तसे पहायला गेल तर कलाकार आणि सोशल मीडियाचे फार जवळचे नाते बनले आहे. सोशल मीडियावर बाल कलाकारांपासून ते जेष्ठ कलाकारांपर्यत सर्वजण आपल्या आयुष्यातील किस्से शेअर करत असतात. या दरम्यान सध्या एका छोट्यामुलीचा फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. हा फोटो दुसरा तिसरा कोणाचा नसून अभिनेत्री मानसी नाईकचा आहे.

मानसी (Manasi Naik) नेहमीच तिच्या नृत्य कलेने प्रेक्षकांचे लक्ष वेढून घेत असते. मानसी तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे देखील मोठ्या प्रमाणावर लाईमलाइट मध्ये येत असते. मानसीने तिच्या सोशल मीडिया अकांऊटवरुन तिच्या आई-वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त तिचा लहानपणीचा फोटो शेअर केला. तसेच तिने जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. ती सोशल मीडियावर सक्रिय असते. तिचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. तिच्या पोस्टवर चाहते भरभरुन कमेंट करत असतात.

फोटो पोस्ट करताना मानसीने लिहीले की, “ने की वजह भी न थी..न हंसने का बहाना था..क्यो हो गए हम इतने बडे..इससे अच्छा तो वो बचपन का जमाना था”तिच्या या पोस्टवर चाहत्यांना कमेंट आणि लाईकचा पाऊसच पाडला आहे. फोटो पाहूण चाहते तिच्या सौंदर्याचे कौतक करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manasi Naik (@manasinaik0302)

यावर कमेंट करताना युजरने लिहीले की, “बालपणापासून तू गोड दिसतेस” दुसऱ्याने लिहीले की, “तुझे सगळे फोटो छान असतात…” तिचे हा फोटो सोशल मीडियावर धुमाकुळ घालत आहे. दरम्यान मराठी मनोरंजनविश्वातील ऐश्वर्या राय म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री मानसी नाईक आहे. तसेच आपल्या डान्समुळे मानसी नाईकला ओळखले जाते. ‘बघतोय रिक्षावाला’, ‘बाई वाड्यावर’ या गाण्यांमुळे ती घराघरात पोहोचली. (Actress Mansi Naik’s childhood photo goes viral)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
फ्लाेरल साडीत क्रिती सेनाॅनने लावले चार चांद, फाेटाे व्हायरल
माधुरी दीक्षितला ‘बहरला हा मधुमास’ गाण्याची भुरळ; व्हिडिओ पाहूण केदार शिंदे म्हणाले…

हे देखील वाचा