Monday, July 1, 2024

‘लोक आपल्या विषयी काय विचार करतात’, प्रदिप खरेराने पोस्ट शेअर करत व्यक्त केल्या भावना

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाईक सतत नवीन गाण्यांमुळे आणि चित्रपटामुळे ओळखली जाते मात्र, ती सध्या तिच्या वैयक्तीक आयुष्यामुळे खूपच चर्चेत आली आहे. मानसी आणि तिचा पती प्रदिप खरेरा यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतल्यामुळे दोघांच्या चर्चांना उधान आले आहे. मानसीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, तिने घटस्फोट घेण्यासाठी कोर्टामध्ये अर्ज दिला आहे.

मराठमोळी अभिनेत्री मानसी नईक (Manasi Naik) हिने आपला पती प्रदिप खरेरा (Pradeep Kharera) यांच्या घटस्फोट घेण्याच्या अनेक दिवसासून चर्चा सुरु होत्या मात्र, अभिनेत्रीने कबूली देऊन खात्री पक्की केली आहे. तिने अचानक आपल्या इंस्टग्राम अकाउंटवरुन प्रदीप सोबत असलेले फोटो आणि व्हिडिओ डिलीट केले होते. घटस्फोट
अर्जाची कबूली दिल्यानंतर तिने सोशल मीडिया वर एक पोस्ट शेअर करत प्रदिपला टोला देखिल मारला होता.

प्रदिप खरेरा हा मॉडेल आणि अभिनेता असून सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. त्याचा मोठा चाहतावर्ग त्याला फॉलो करतो. मानसीच्या वक्तव्यानंतर त्याने देखिल मौन सोडले आहे. नुकतंच त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्याने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “लोक आपल्याविषयी काय विचार करतात याने मला काही फरक पडत नाही, कारण मला माहित आहे की, मी कोण आहे आणि याचा मला अभिमान आहे.” अशा शब्दात त्याने आपली बाजू मांडली असून एक प्रकारे मानसीला टोला मारल्याचे दिसून येते.

 

View this post on Instagram

 

मानसी आणि प्रदीप खरेरा यांचे लग्न (दि, 19 जानेवारी 2021) मध्ये पार पडले होते. लग्नानंतर दोघेही खूपच खुश असून सोशल मीडियावर सतत यांचे व्हिडिओ व्हायरल व्हायचे त्यामुळे चाहते देखिल यांच्या जोडीला चांगला प्रतिसाद द्यायचे. मात्र, हे दोघे वेगळे होणार असल्यामुळे चाहत्यांनादेखिल आश्चर्याचा धक्का बसला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
राखी सावंतने सांगितला होळीचा किस्सा, जेव्हा तिने फुगे समजून कंडोममध्ये भरले होते पाणी तेव्हा…
राखी सावंतबद्दल प्रश्न विचारताच संतापला मिका सिंग, थेट पत्रकाराला केली शिवीगाळ

हे देखील वाचा