Friday, April 19, 2024

“स्त्री म्हणून माझा स्वाभिमान…” मानसी नाईकने सांगितले घटस्फोट घेण्यामागचे कारण

बघतोय रिक्षावाला’, ‘बाई वाड्यावर’ यासारखे दमदार गाणे देणाऱ्या मानसी नाईक हिने आपल्या उत्तम नृत्यशैलीच्या बळावर चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण केले. मात्र, आता मानसी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. मानसी आणि तिचा नवरा प्रदीप खरेरा यांच्या वैवाहिक आयुष्यात मतभेद झाले आहे. त्यामुळे मानसी लवकरच घटस्फाेट घेणार आहे. एका मुलाखतीदरम्यान मानसीने घटस्फाेटासाठी अर्ज दिल्याचे सांगितले आणि तिच्यात व प्रदीपमध्ये नेमकं काय झाले याबद्दलही तिने खुलासा केला.

मानसी नाईक (manasi naik) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. अलीकडेच, अभिनेत्रीने माध्यमाना मुलाखत दिली. या मुलाखतीत मानसीने तिच्या वैवाहिक आयुष्यावर हाेत असलेल्या चर्चांवर माैन साेडले आणि म्हणाली, “माझ्या आणि प्रदीपच्या घटस्फाेटाबद्दल सुरु असलेल्या चर्चा खऱ्या आहेत. मी प्रदीपला घटस्फोटासाठी अर्ज दिला आहे आणि घटस्फाेटासंबंधी प्रक्रियेला आता सुरुवातही झाली आहे. मी आता या क्षणाला खूपच दुःखी आहे.” असे अभिनेत्रीने मुलाखतीदरम्यान सांगितले.

मानसी घटस्फाेटामागील कराण सांगत असताना पुढे म्हणाली, प्रदीप आणि माझ्यात नेमके काय चुकले हे सांगणे आता माझ्यासाठी कठीण आहे. आमच्यात काही गोष्टी ठीक होऊ शकल्या नाहीत, पण हे सगळे खूपच वेगात घडले. आजही माझा प्रेमावर विश्वास आहे. मला पुन्हा प्रेम करायचे आहे. पण एक वेळ अशी होती जेव्हा मला माझे कुटुंब हवे होते आणि त्यामुळे मी लग्न केलं.

मला वाटतं कदाचित तिथेच काहीतरी चुकले. या वैवाहिक नात्यातून वेगळे होण्याची वेळ आता आली आहे. त्याच्याबद्दल आणि त्याच्या कुटुंबाबद्दल मला कायम आदर राहिण, पण एक स्त्री म्हणून माझा स्वाभिमान आणि स्वतःची काही मतंही महत्त्वाची आहेत. एखाद्या व्यक्तीला आपण सोडून देऊ एवढ्या खालच्या थराला ती जाऊ शकते हे समजून घेणे माझ्यासाठी गरजेचं होतं.”

माणसी पुढे म्हणाली, “मी आता माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित करणार आहे. सध्या एक कलाकार म्हणून माझ्यासाठी माझं कुटुंब, माझा मित्रपरिवार, मी स्वतः आणि माझे प्रेक्षक हेच खूप महत्त्वाचे आहे. कधी कधी तुमचा माणसांवरील विश्वास उडतो आणि हेच माझ्याबाबतीत घडले. मला भावनिकदृष्ट्या आधाराची गरज होती. मात्र, दुर्दैवाने या वैवाहिक आयुष्यात मला असे काहीच मिळाले नाही. जर एकाच व्यक्तीला कायम समर्थन मिळत असेल आणि दुसऱ्या व्यक्तीला ते मिळत नसेल तर मला वाटते अशा नात्यातून बाहेर पडणे नेहमीच चांगले. जर तुमच्या वैवाहिक आयुष्यात हा समजूतदारपणा नसेल तर ती तुमच्यासाठी धोक्याची सूचना आहे.”

मानसी नाईक हिच्या काराकिर्दी विषयी बाेलायचे झाले, तर तिने ‘जबरदस्त’, ‘फक्त लढ म्हणा’ यासारख्या दमदार चित्रपटांमध्ये काम केले आहे. याव्यतिरिक्त तिने रिऍलिटी शाेचे परीक्षणही केले आहे. (dancer manasi naik talk about why she taking divorce from husband pradeep kharera)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
फटाके वाजवा रे! रश्मिका मंदान्ना अन् विजय देवरकोंडा अडकले विवाह बंधनात?

‘सब गोलमाल है भाई…ये पप्पू कभी पास नही होगा!’, अभिनेत्री पुजा भट्टचा खुलासा

हे देखील वाचा