हिंदी चित्रपटसृष्टीत असे अनेक किस्से ऐकायला मिळतात ज्यामुळे सर्व सामान्य प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का बसतो. कारण हे किस्से असतात ज्यांची आपण कधीही कल्पनाच करू शकत नाही. एवढ्या मोठ्या यशाच्या शिखरावर असलेल्या या कलाकारांच्या घरीही आपल्या सारखेच वादविवाद पाहायला मिळतात ही खरी आश्चर्याची बाब आहे. असाच एक किस्सा अभिनेत्री मधुबालाच्या घरीही घडला आहे.
दिवंगत अभिनेत्री मधुबाला (madhubala) ही चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री होती. तिच्या दमदार अभिनयाची आजही चर्चा ऐकायला मिळत असते. गेल्या काही दिवसापूर्वी मधुबालाची बहीण कनीज बलसाराला तिच्या सूनेने घराबाहेर काढल्याची माहिती समोर आली होती. आता या प्रकरणावर आणखीन माहिती समोर आली आहे. कनीजची सून समीनाने आपल्या 96 वर्षीय सासूला फक्त घराबाहेर काढले नाही, तर काहीही पैसे न देता औकलँडमधून मुंबईच्या विमानात बसवून दिले. या बाबत कनीजची मुलगी परवीजला ही कसलीच कल्पना दिली नाही. आता परवीजने यावर धक्कादायक खुलासे केले आहेत.
परवीजने माध्यमांशी बोलताना सांगितले की, “आई 17-18 वर्षापूर्वी भाऊ फारुखसोबत न्यूझीलंडला रहायला गेली होती. तिचे फारुखवर खूप प्रेम होते. फारुख सुद्धा आईचीच काळजी घ्यायचा, मात्र फारुखच्या पत्नीला तिची सासू अजिबात आवडत नव्हती. आई घरी आल्यावर समजल की, माझ्या भावाचा मृत्यू झाला आहे. भावाच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीने आईचे अतोनात हाल केले.”
यावेळी पुढे बोलताना परवीजने सांगितले की, “समीना कधीच आई बाबांसाठी जेवण बनवत नसायची. भाऊ त्यांच्यासाठी हॉटेलमधून जेवण आणायचा. फक्त समीनाच नव्हे तर तिची मुलगी सुद्धा आजीसोबत वाईट वर्तन करायची. तिनेच आईला जबरदस्तीने मुंबईच्या विमानात बसवून दिले”. आपल्या आईचे हे दुःख सांगताना परवीज खूपच भावूक झाली होती. “मी नेहमी न्यूझीलंडला जाते आईची भेट घेते, मात्र आता आईच्या आरोग्यामुळे तिला इकडे आणता येत नव्हते. यावेळी विमानातून उतरल्यानंतर आईकडे RT PCR टेस्ट करण्याइतके सुद्धा पैसे नव्हते, मला त्यांचा कॉल आला, पैसे पाठवले तेव्हा आईची टेस्ट झाली.” असही परवीजने रडत रडत सांगितले.
“आईने आल्या आल्या तुझा भाऊ गेला असे म्हणत मला भूक लागलीये जेवायला मिळेल का?” असा प्रश्न परवीजला केला ज्यामुळे तिच्या अश्रूंचा बांध फुटल्याचे तिने सांगितले. त्याचबरोबर आई सुखरुप आहे याबद्दल तिने देवाचे आभारही मानले. दरम्यान अभिनेत्री मधुबाला ही हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री होती. अनेक हिंदी चित्रपटात तिने काम केले असून तिच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे अनेक चाहते आजही पाहायला मिळतात.
हेही वाचा :