Friday, March 29, 2024

‘सलमान माझ्या चपला सांभाळायचा माझ्यामुळेच…’ अभिनेते जॅकी श्रॉफ यांचा मोठा दावा

बॉलिवूडचा दबंग सलमान खान आपल्या अभिनयामुळे सतत चर्चेत असतो. त्याच्या प्रत्येक चित्रपटाची नेहमीच चर्चा होताना दिसत असते. मेगास्टार सलमान खानची लोकप्रियता इतकी आहे की त्याच्या नावावरच कोणताही सिनेमा सुपरहिट ठरू शकतो. सलमान खानच्या चित्रपटा इतकीच त्याच्या खासगी आयुष्याची ही नेहमी चर्चा होत असते. अभिनेता जॅकी श्रॉफने सलमान खानबद्दल आता एक धक्कादायक खुलासा केला आहे.

अभिनेता सलमान खान (salman khan) त्याच्या चित्रपटा इतकाच आपल्या दिलदारपणामुळे सदैव चर्चेत असतो. चित्रपट क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकारांशी त्याचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. सलमान खान प्रत्येकाला मदत करायला तयार असतो अशीच त्याची खासियत आहे. अभिनेते जॅकी श्रॉफ आणि सलमान खानची मैत्री तर जगजाहीर आहे. सलमान खानने आपल्या अभिनयाची सुरुवात जॅकी श्रॉफसोबत केली होती. तेव्हापासून दोघेही जिवलग मित्र आहेत. त्यांच्या मैत्रीचे अनेक किस्से ऐकायला मिळतात. दोघांनी 6 एकत्र चित्रपटात काम केले आहे. सलमान खानच्या ‘राधे’ चित्रपटात ही जॅकी श्रॉफने भूमिका साकारली होती. याआधी ते ‘भारत’ चित्रपटातही झळकले होते. असं म्हणतात की, सलमान खानच्या चित्रपटासाठी ते कधीच विचार करत नाहीत. क्षणाचाही विलंब न करता होकार देऊन टाकतात.

अलीकडेच जॅकी श्रॉफने एका मुलाखतीत बोलताना सलमान खान आणि त्यांच्या मैत्रीबद्दल खुलासे केले होते. त्यावेळी त्यांनी सांगितले की, “मी सलमानला पहिल्यांदा मॉडेल म्हणून ओळखत होतो. त्यानंतर तो चित्रपटाचा असिस्टंट डायरेक्टर झाला. ‘फलक’ चित्रपटावेळी तो माझे कपडे आणि बूट सांभाळत असायचा. सलमान माझी छोट्या भावाप्रमाणे काळजी घ्यायचा. मी अनेक दिग्दर्शकांना सलमान खानचे फोटो दाखवायचो. सलमान खानला ‘मैने प्यार किया’ चित्रपटातून लोकप्रियता मिळाली असली, तरी तो माझ्यामुळेच चित्रपट क्षेत्रात प्रसिद्ध झाला.” दरम्यान सलमान खान आणि जॅकी श्रॉफ खूप चांगले मित्र असून अनेकदा एकत्र फिरताना दिसतात.(`salman khan handle my clothes and shoes says jackie shroff)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
तब्बल पाच वर्षांनी दीपिका पदुकोणचा सिनेमा झाला हिट, भावनिक होत म्हटले शाहरुखला धन्यवाद

आमिरने गायले त्याचे सुपरहीट गाणे, कार्तिकसाेबत केला डान्स; पाहा व्हायरल व्हिडिओ

हे देखील वाचा