26नोव्हेंबर हा दिवस भारतात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी भारतीय संविधानाचा स्वीकार करण्यात आला होता. भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. या संविधानाने भारतीय लोकांना अनेक हक्क आणि कर्तव्ये दिले आहेत. संविधान दिनाच्या निमित्ताने संविधानाबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे. संविधानातील अधिकार आणि कर्तव्ये समजून घेणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. याच संविधान दिनानिमित्त एका मराठी अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
26नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधानाच्या (Constitution Day) स्वीकाराचा आणि अमलबजावणीचा दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी, संविधान सभेने 26 नोव्हेंबर1949 रोजी भारतीय संविधानाचा स्वीकार केला आणि 26 जानेवारी 1950 रोजी ते लागू झाले. संविधानाने भारताला एक प्रजासत्ताक देश म्हणून घोषित केले आहे आणि त्यात सर्व नागरिकांना समान अधिकार आणि कर्तव्ये प्रदान केली आहेत. या खास दिनी दिवशी अभिनेत्री मेघा घाडगेने खास पोस्ट शेअर केली आहे.
मेघा घाडगेने पोस्ट करताना लिहिले की, “ज्यांनी संविधान लिहून या उभ्या भारत राष्ट्राला खरे स्वातंत्र्य मिळवून दिले. ज्या संविधानाच्या बळावर आपल्या भारताने सर्वात मोठ्या लोकशाहीचा किताब मिळवला. ज्या संविधानाने देशातील प्रत्येक माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. त्या शाश्वत संविधानाचे रचनाकार भारतरत्न डॉ भीमराव आंबेडकर यांना आजच्या संविधान दिनी विनम्र अभिवादन.”
View this post on Instagram
मेघा घाडगेच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी लाईक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. कमेंट करताना एकाने लिहिले की, “स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या तत्वांना अधिष्ठान प्राप्त करून देणारे भारतीय संविधान…संविधान दिन चिरायू होवो. दुसऱ्याने लिहिले की, “जय भीम जय संविधान” तर काहीनी “साविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या सर्व भारतीयांना ” असे लिहिले आहे. (Actress Megha Ghadgeni post on Constitution Day is in discussion)
आधिक वाचा-
–सलमान खानच्या छोट्या चाहत्याने जिंकली सगळ्यांची मनं, ‘या’ चिमुकल्या ‘टायगर’चा व्हिडिओ पाहाच
–‘माझ्या मुलाला चप्पलने मारते, आता तू…’,विकी जैनच्या आईने केली अंकिताची कानउघडणी