Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

मीराने ख्रिसमस पार्टीची तयारी केली होती पूर्ण; पण तेव्हाच घडली मोठी चूक, ऐनवेळी…

सर्वत्र ख्रिसमसच्या पार्ट्या सुरू झाल्या आहेत. सर्वसामान्य व्यक्तींपासून ते बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी आपापल्या घरी ख्रिसमस ट्री सजवले आहेत. त्याचबरोबर काहीजण यानिमित्त पार्टीचेही आयोजन करणार आहेत. शाहिद कपूर आणि मीरा राजपूत दरवर्षी त्यांच्या मुलांसोबत हा सण साजरा करतात. मीराने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती ख्रिसमस ट्री सजवताना दिसत आहे. तिने सांगितले की, ही तिची शेवटच्या क्षणाची तयारी आहे. कारण तिने चार वर्षांपासून सजवलेले ख्रिसमस ट्री गमावला आहे.

मागील ४ वर्षांपासून फक्त एकच होते ख्रिसमस ट्री
मीराने (Mira Rajput) तिच्या व्हिडिओसह एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “हो… आम्ही ख्रिसमस ट्री गमावला. मी गेल्या ४ वर्षांपासून तेच सुंदर ६ फूट उंच, गडद हिरवे झाड वापरत आहे आणि दरवर्षी काही नवीन सजावट करत असे. दरवर्षी ते ख्रिसमस लेबल असलेल्या बॉक्समधून बाहेर येते आणि २६ डिसेंबर रोजी परत जाते.”

ऐनवेळी नवीन केले खरेदी
मीरा पुढे लिहिले की, ”यावर्षी मी मुलांसाठी ख्रिसमस पार्टी केली होती, जिथे मुख्य गोष्ट होती झाडाला सजवणे. आम्ही घरभर शोधले पण बॉक्स सापडला नाही. नुकताच डेकोरेशन बॉक्स मिळाला. उफ्फ.” मीरा सांगते की, तिने शेवटच्या क्षणी आणखी एक ख्रिसमस ट्री विकत घेतला. तिने लिहिले की, “हे शेवटच्या क्षणी विकत घेतलेले झाड होते आणि हो मला ते फारसे आवडत नाही, पण मुलांना ते सजवायला आवडते. त्यांनी ते उत्तम प्रकारे केले आणि मी त्यांना थांबवले नाही.”

मेरी ख्रिसमस
मीराने लिहिले की, “मला आशा आहे की, मला ते कुठेतरी सापडेल, मी शेजारी आणि माझ्या आईला देखील विचारले की, मी त्यांना ते ठेवण्यास सांगितले का? माझे बाबा राजपूत कुटुंबातील ब्लॅक होलचे तर्क देतात जिथे गोष्टी जादूने गायब होतात आणि पुन्हा कधीही सापडत नाहीत. मला वाटते माझ्या बाबतीतही असेच घडते आहे. तुम्हा सर्वांना ख्रिसमसच्या आणि सुट्टीच्या शुभेच्छा.”

यापूर्वी तिने ख्रिसमसच्या थीमवर आधारित स्वीट डॅश देखील बनवली होती. ज्याचा व्हिडिओ तिने इंस्टाग्रामवर शेअर केला होता. तिने व्हिडिओसह सांगितले होते की, तिने ख्रिसमसच्या व्हाईबसाठी कुकीज रंगवल्या आहेत. मीराच्या या व्हिडिओमध्ये ती मुलांसाठी हा सण खास बनवण्यासाठी किती मेहनत घेत आहे, हे स्पष्टपणे दिसून येते.

हेही वाचा-

हे देखील वाचा