Wednesday, July 3, 2024

इंग्रजीवरून आणि बॉडीशेमिंगवरून ट्रोल झालेली मोनालिसा नेहमीच करते ट्रोलर्सकडे दुर्लक्ष

भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांबरोबर शेअर करत असते. ती अनेकदा तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते. पण कधीकधी तिला सोशल मीडियावर ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. तिने सांगितले की, तिला अनेक वेळा ट्रोल व्हावे लागले आहे. मोनालिसाच्या दिलेल्या एका मुलाखतीत तिने तिच्या आयुष्याशी संबंधित अनेक महत्त्वाचे खुलासे केले आहेत. तिने सांगितले की, असे अनेकवेळा घडले जेव्हा तिला प्रेक्षकांचे टोमणे ऐकावे लागले आणि त्यांनी तिला प्रचंड ट्रोल केले आहे.

मोनालिसा म्हणाली की, “मी माझ्या आयुष्यात अनेकवेळा ट्रोलिंगची शिकार झाली. पण आता असे वाटते की, ते पूर्वीपेक्षा कमी झाले आहे. सुरुवातीला लोकं माझ्याबद्दल खूप नकारात्मक गोष्टी लिहायचे. मला शरीराबद्दल बर्‍याच नकारात्मक प्रतिक्रिया देखील ऐकायला मिळाल्या होत्या. लोकं मला लाजवायचे. एवढेच नाही, तर चांगले इंग्रजी न बोलल्यामुळे सुद्धा मला ट्रोल केले गेले. माझ्या ड्रेसिंग सेन्सवरही वाईट प्रतिक्रिया दिल्या गेल्या आहेत.”

मोनालिसा पुढे म्हणाली की, “जेव्हा मी हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला, तेव्हा मी खूप भोळी होती. पण माझ्यासाठी जे लोकं मला ट्रोल करत राहतात त्यांच्यापेक्षा माझ्यावर प्रेम करणारे लोकं जास्त महत्वाचे आहेत. सुरुवातीला ट्रोलिंगमुळे मला फरक पडत होता. पण हळूहळू मला समजले की, त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे योग्य आहे.”

मोनालिसा म्हणाली की, “इंडस्ट्रीमध्ये प्रवेश करताच मी स्वतःला कसे बदलू शकले असते? ग्रूमिंगलाही वेळ लागतो, मी इंग्रजी कसे बोलू शकते? जर मी बोलू शकत नाही, तर नाही बोलू शकत, त्यात काय चूक आहे? मी एक कलाकार आहे आणि माझे काम प्रेक्षकांचे मनोरंजन करणे आहे.”

मोनालिसा म्हणाली की, “मी भोजपुरीमध्ये सुमारे १०० चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण मला कोणीही नकारात्मक भूमिकेत पाहिले नव्हते. जेव्हा मी चित्रपट करते, तेव्हा मी सर्व प्रकारचे चित्रपट करण्याचा प्रयत्न करते.” ‘नजर’ या मालिकेत मोनालिसा खूप आवडली होती. यावर बोलताना ती म्हणाली, “जेव्हा मला ही मालिका मिळाली तेव्हा मी खूप उत्साहित होते. जेव्हा या भूमिकेत प्रेक्षकांनी मला प्रेक्षक पसंत केल्याने मला छान वाटते.”

मोनालिसा तिच्या खऱ्या आयुष्यातही खूप बोल्ड आणि ग्लॅमरस आहे. तिचे फॅन्स नेहमी तिच्या फोटोंवर कमेंट्स करून तिचे कौतुक करताना दिसतात. मोनालिसाने बिग बॉसद्वारे हिंदी टीव्ही इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले. ती बिग बॉसची लोकप्रिय स्पर्धक होती.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

किशोर कुमार यांना आधीच लागली होती मृत्यूची चाहूल, म्हणूनच त्यांनी…

बिग बॉसच्या घरात डोनल बिष्ट सदस्यांच्या निशाण्यावर, ‘या’ सदस्यांनी घेतला तिचा क्लास

अमोल कोल्हेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र, “राज्य सरकारचा ‘हा’ नियम थिएटर व्यावसायाच्या मुळावर घाव घालणारा”

हे देखील वाचा