भोजपुरी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मोनालिसा तिच्या हॉट लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. मोनालिसाची ग्लॅमरस स्टाईल कुणालाही तिचे वेड लावू शकते. पुन्हा एकदा अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांसाठी हॉट फोटो शेअर केले आहेत. जे पाहून कोणाचेही होश उडतील. तिचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
भोजपुरी क्वीन मोनालिसा
भोजपुरी चित्रपटांची क्वीन म्हटली जाणारी अभिनेत्री मोनालिसा (Monalisa) जेव्हाही पडद्यावर येते तेव्हा चाहते तिला पाहतच राहतात. आज प्रत्येक घरात तिने एक खास ओळख निर्माण केली आहे. भोजपुरी चित्रपटांपासून ते हिंदी टीव्ही शोपर्यंत, अभिनेत्रीने इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. देशभरात मोनालिसाचे चाहते आहेत.
मोनालिसा सोशल मीडियावर असते सक्रिय
चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ही अभिनेत्री सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. इंस्टा पोस्टमध्ये ती अनेकदा हॉट अवतारात दिसते. आता पुन्हा एकदा मोनालिसाने आपल्या स्टाईलने चाहत्यांना घायाळ केले आहे. दरम्यान, अलिकडेच तिने तिच्या इंस्टाग्राम पेजवर एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ती बेडरूममध्ये दिसत आहे. या फोटोमध्ये मोनालिसाने ब्लू कलरचा शॉर्ट नाइट सूट परिधान केला आहे. त्यावर पांढऱ्या रंगाची फ्लोरल प्रिंट आहे. फोटोमध्ये मोनालिसा तिच्या केसांशी खेळताना दिसत आहे.
मोनाचा नो-मेकअप लूक
या फोटोत मोनालिसा नो-मेकअप लूकमध्ये दिसत आहे. यासोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “Waking Up To This… Pic Pe Music ????♀️…. Using this For the First Time… ” आता तिचा हा फोटो चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मोनालिसाचा हा हॉट अवतार तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. चाहते तिचे यावेळी कौतुक करताना थकत नाहीत. काही तासांतच तिच्या फोटोवर प्रचंड हजारो लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत. चाहत्यांच्या फोटोंवर सतत कमेंट पाहून त्यांच्या या अदेवर ती फिदा झाली आहे.
हेही वाचा-