Monday, July 1, 2024

मोनालिसाने ‘अंग लगा…’वर कंबर लचकवत वेधले चाहत्यांचे लक्ष; ठुमका पाहून चाहताही म्हणाला, ‘जीवच जाईल’

भोजपुरी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये मोनालिसा हिच्या नावाचा समावेश होतो. सध्या मोनालिसा भोजपुरी इंडस्ट्रीपासून दूर आहे. मात्र, ती सोशल मीडियावरून चाहत्यांचे जोरदार मनोरंजन करत असते. सध्या ती टीव्ही आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर आपल्या अदांनी चाहत्यांचे लक्ष वेधत आहे. अशात तिचा एक लेटेस्ट व्हिडिओ समोर आला आहे, ज्याने चांगली खळबळ माजवली आहे. या व्हिडिओतील तिच्या अदा, एक्सप्रेशन्स आणि सिझलिंग मूव्हज पाहून चाहतेही फिदा झाले आहेत. विशेष म्हणजे, यामध्ये ती दीपिका पदुकोण हिच्या गाण्यावर ठुमके लावत तिला टक्कर देत आहे. तिचा हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

मोनालिसा (Monalisa) हिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत मोनालिसा कंबर लचकवत डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओत मोनालिसाने पांढऱ्या रंगाची साडी आणि निळ्या रंगाचा ब्लाऊज परिधान केला आहे. ती तिच्या सिझलिंग मूव्हज आणि घायाळ करणाऱ्या अदांनी चाहत्यांना भुरळ घालत आहे.

मोनालिसाची पोस्ट
हा व्हिडिओ शेअर करत मोनालिसाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “अंग लगा दे रे… माझे आवडते आहे.” म्हणजेच दीपिका पदुकोण (Deepika Padukone) हिच्या ‘रामलीला’ सिनेमातील ‘अंग लगा दे रे’ हे गाणे मोनालिसाला खूप आवडते.

 

View this post on Instagram

 

A post shared by MONALISA (@aslimonalisa)

चाहत्यांच्या कमेंट्स
मोनालिसाचा हा व्हिडिओ चाहत्यांना भलताच आवडला आहे. या व्हिडिओवर चाहत्यांनी 19 हजारांहून अधिक लाईक्सचा आणि शेकडो कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका युजरने कमेंट करत लिहिले, “नेहमीप्रमाणेच फायर.” दुसऱ्या एकाने कमेंट केली की, “मॅडम असे वाटते की, तुम्हाला पाहता पाहताच जीव जाईल.” आणखी एकजण म्हणाला की, “थंडी वाजेल काळजी घे.”

मोनालिसाच्या कामाविषयी बोलायचं झालं, तर ती सध्या अनेक वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. ती लवकरच ‘फव्वारा चौक’मध्ये दिसणार आहे. यापूर्वी ती ‘रात्रि के यात्रि 2’मध्येही झळकली होती. मोनालिसा सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिला इंस्टाग्रामवर तब्ब्ल 50 लाखांहून अधिक चाहते फॉलो करतात. त्यामुळेच कदाचित तिच्या प्रत्येक पोस्टवर हजारो लाईक्सचा वर्षाव होत असतो. (actress monalisa shows sizzling dance moves on deepika padukone song ang laga de see viral video)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आली लहर केला कहर! ‘आरआरआर’ने जगातल्या सर्वोत्तम 50 सिनेमांच्या यादीत टॉम क्रूझलाही टाकलं मागं
फक्त सिनेमाच ब्लॉकबस्टर, 400 कोटींच्या ‘कांतारा’च्या कलाकारांना दिले फक्त ‘एवढे’ मानधन; आकडा करेल हैराण

हे देखील वाचा