Sunday, April 14, 2024

फक्त सिनेमाच ब्लॉकबस्टर, 400 कोटींच्या ‘कांतारा’च्या कलाकारांना दिले फक्त ‘एवढे’ मानधन; आकडा करेल हैराण

यावर्षी सप्टेंबरच्या अखेरीस प्रदर्शित झालेला सिनेमा म्हणजे ‘कांतारा‘ होय. छोट्या बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली. हा सिनेमा आता ओटीटीवरही चांगलीच धमाल करताना दिसत आहे. या सिनेमावर फक्त साऊथ इंडस्ट्रीतीलच नाही, तर बॉलिवूड कलाकारांनाही कौतुकाचा वर्षाव केला. कन्नडमध्ये रिलीज झालेल्या हा सिनेमा प्रचंड मागणीनंतर भारतातील इतर भाषांमध्येही डब करून रिलीज करण्यात आला. कमी बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमाने तब्बल 400 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. मात्र, या सिनेमातील कलाकारांना मिळालेले मानधन पाहून तुमच्याही भुवया उंचावतील. चला तर जाणून घेऊया किती आहे त्यांचे मानधन…

रिषभ शेट्टी
‘कांतारा’ (Kantara) या सिनेमात रिषभ शेट्टी (Rishabh Shetty) याने फक्त अभिनयच केला नाही, तर त्याने दिग्दर्शनही केले. साऊथच्या एका वेबसाईटनुसार, रिषभने या सिनेमासाठी फक्त 4 कोटी रुपये मानधन घेतले. सिनेमाच्या कमाईच्या तुलनेत रिषभचे मानधन खूपच कमी आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by prime video IN (@primevideoin)

प्रमोद शेट्टी
अभिनेता प्रमोद शेट्टी (Pramod Shetty) यांनी सिनेमात सुधाकर ही भूमिका साकारली आहे. या सिनेमासाठी त्यांना माध्यमांतील वृत्तांनुसार, 60 लाख रुपये मानधन दिले आहे.

किशोर
‘कांतारा’ या सिनेमात किशोर (Kishore) याने वन अधिकारी मुरलीधरची भूमिका साकारली आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, किशोरने या सिनेामसाठी जवळपास 1 कोटी रुपये मानधन घेतले आहे.

सप्तमी गौडा
सप्तमी गौडा (Sapthami Gowda) या अभिनेत्रीने ‘कांतारा’ सिनेमात मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे. तिने लीला हे पात्र साकारले आहे. यासाठी तिला 1 ते 1.25 कोटी रुपये मानधन देण्यात आले आहे. खरं तर, अभिनेत्रीच्या कारकीर्दीतील ‘कांतारा’ हा दुसराच सिनेमा आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sapthami Gowda ???? (@sapthami_gowda)

अच्युत कुमार
अच्युत कुमार यांनी ‘कांतारा’ या सिनेमात नकारात्मक भूमिका साकारली आहे. त्यांनी देवेंद्र सुत्तुरू हे पात्र साकारले आहे. कथितरीत्या त्यांना या भूमिकेसाठी जवळपास 40 लाख रुपये मिळाले आहेत. अच्युत कुमार हे ‘केजीएफ 2’मधील त्यांच्या अभिनयासाठीही ओळखले जातात. (actor rishab shetty saptami gowda and other celebs look at the fees of the star cast of kantara)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘गोविंदाला त्याचा हक्क मिळाला नाही, आज तो सर्वात मोठा सुपरस्टार असता’, रोहित शेट्टीचे भाष्य
‘शाहरुख खानला जिवंंत जाळेल’, अयोध्याच्या महंत परमहंसांची कॅमेऱ्यासमोर ‘किंग खान’ला धमकी

हे देखील वाचा