Wednesday, April 23, 2025
Home अन्य लग्नानंतर मौनी रॉय-सूरज नांबियारने केली पूल पार्टी, सर्वांसमोर केला रोमँटिक डान्स

लग्नानंतर मौनी रॉय-सूरज नांबियारने केली पूल पार्टी, सर्वांसमोर केला रोमँटिक डान्स

अभिनेत्री मौनी रॉय सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सध्या तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये ती तिचा पती सूरज नंबियारसोबत दिसत आहे. मौनी आणि सूरजच्या लग्नाच्या अल्बममधील काही नवीन फोटो सध्या चर्चेत आहेत. मौनीच्या लग्नातील पूल पार्टीचा आनंदही सर्वांनी घेतला आणि आता या प्रसंगाची झलक चर्चेत आहे. मौनीने सोशल मीडियावर तिच्या वेडिंग पूल पार्टीचा व्हिडिओ शेअर केला आहे. जो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

या नवीन व्हिडिओमध्ये वधू आणि वर म्हणजेच सूरज आणि मौनी (Mouni Roy ) परफॉर्म करताना दिसत आहेत. लग्नानंतर वधू आणि वराने या पूल पार्टीचा मनसोक्त आनंद लुटला, त्याची झलक तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता. मौनी आणि सूरज यांनी एकमेकांचे हात भरून एक रोमँटिक डान्स केला. तसेच कुटुंब आणि मित्रांनीही या प्रसंगातील प्रत्येक क्षण भरभरून जगला. नवीन जोडीसोबत सगळ्यांनी खूप धमाल केली आहे.

या पूल पार्टीच्या व्हिडिओमध्ये कधी मौनीला सूरज उचलून घेऊन डान्स करताना दिसत आहे. तर कधी दोघे लिपलॉक करताना दिसत आहेत. मौनी आणि सूरजने नुकतेच २७ जानेवारीला गोव्यातील हिल्टन रिसॉर्टमध्ये लग्न केले. दोघांनी प्रथम मल्याळी रितीरिवाजांनुसार लग्न केले आणि नंतर बंगाली रितीरिवाजांनुसार लग्न केले. मौनी आणि सूरजच्या लग्नापासून ते प्री-वेडिंग आणि पोस्ट-वेडिंगपर्यंतचे फोटो सोशल मीडियावर खूप पाहायला मिळत आहेत.

मौनी रॉय ही एक इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध चेहरा बनली आहे, तर सूरज हा या सर्वांपासून दूर असलेला इन्व्हेस्टमेंट बँकर आहे. सूरजचा जन्म ६ ऑगस्ट रोजी कर्नाटकातील बंगळरू येथील एका जैन कुटुंबात झाला. त्याचे प्रारंभिक शालेय शिक्षण जैन इंटरनॅशनल रेसिडेन्शियल स्कूलमधून झाले. नंतर, २००८ मध्ये त्याने बंगळुरूच्या आरव्ही कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग केले. बिझनेसमन असण्यासोबतच सूरज दुबईस्थित इन्व्हेस्टमेंट बँकर देखील आहे.

हेही वाचा :

 

 

हे देखील वाचा