Monday, July 1, 2024

‘मला हार्ट अटॅक तर…’, ‘बबिता भाभी’च्या‌‌ होळीच्या व्हिडिओवर चाहत्याची भन्नाट कमेंट

छोट्या पडद्यावर नावाजलेली विनोदी मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उलटा चष्मा.’ या मालिकेमधील विनोदी पात्र आणि विनोद यामुळे ही मालिका खूपच लोकप्रिय आहे. या मालिकेच्या मोठ्या यशामागचे कारण म्हणजे या मालिकेतील पात्र. प्रत्येक पात्राने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. जसे की, दयाबेन, जेठालाल, बबिता, बापूजी, टपू आणि तारक मेहता. या सर्वांची फॅन फॉलोविंग जबरदस्त आहे. या मालिकेत बबिता भाभीचे पात्र निभावणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता हिची देखील खूप फॅन फॉलोविंग आहे.

ती नेहमीच तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. आताच तिने तिचा होळीदरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात तिच्या अदा पाहून सगळेच घायाळ झाले आहेत.

मुनमुन दत्ताने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. तो सध्या सगळीकडे मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तिने लाल रंगाचा कुर्ता घातला आहे. या सोबतच मेटॅलिक इअररिंग आणि ब्रेसलेट घातले आहे. तिने गालाला गुलाबी रंग लावलेला दिसत आहे. तिच्या बॅकग्राउंडला ‘ये जवानी है दिवानी’ मधील ‘बलम पिचकारी’ हे गाणे वाजत आहे. या गाण्यावर ती डान्स स्टेप्स करताना दिसत आहे. तिचे चाहते हा व्हिडिओ मोठ्या संख्येने लाईक्स करत आहे.

हा व्हिडिओ शेअर करत तिने ‘हॅप्पी होली’ असे कॅप्शन लिहिले आहे. तिच्या या व्हिडिओला तिच्या चाहत्यांकडून‌ खूप प्रतिक्रिया येताना दिसत आहे. काहीजण तिच्या हावभावाचे कौतुक करत आहेत, तर काहींना तिची स्माईल आवडली आहे. हा व्हिडिओ बघून तिच्या एका चाहत्याने अशी कमेंट केली आहे की, ‘हा व्हिडिओ बघून मला हार्ट अटॅक तर नाही ना येणार.’ अशाप्रकारे तिच्या चाहत्यांनी तिचे खूपच कौतुक केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-प्रांजल दहियाच्या ‘बीपी हाय’ गाण्याची इंटरनेटवर धूम, एकाच दिवसात मिळाले २० लाखांपेक्षाही अधिक हिट्स

-मानलं पाहिजे! धर्मेश येलांडेने केले होते ऑडिशनमध्ये रिजेक्ट; सहा वर्षांनंतर अभिनेत्रीने त्याच स्टेजवर केले आपल्या चित्रपटाचे प्रमोशन

-व्हिडिओ! ‘कुछ तो है’ मालिकेच्या सेटवरही दिसली होळीची मस्ती, अभिनेत्री कृष्णा मुखर्जीकडून मजेशीर व्हिडिओ शेअर

हे देखील वाचा