Monday, May 13, 2024

प्रांजल दहियाच्या ‘बीपी हाय’ गाण्याची इंटरनेटवर धूम, एकाच दिवसात मिळाले २० लाखांपेक्षाही अधिक हिट्स

आजकाल प्रेक्षकांमध्ये हरियाणवी गाणी खूप लोकप्रिय होत आहेत. याच कारणामुळे, एकामागून एक नवीन हरियाणवी गाणी रिलीझ होत आहेत. एवढेच नव्हे, तर ही गाणी रिलीझ होताच व्हायरल होऊ लागतात. इंटरनेटवर हरियाणवी गाणे सतत धमाल करताना दिसतात. या गाण्यांमध्ये रेणुका पंवारची बहुतेक गाणी प्रेक्षकांच्या जीभेवर आहेत. या महिन्यातही रेणुका पंवारची अनेक गाणी रिलीज झाली आहेत. बुधवारी (३१ मार्च) तिचे आणखी एक गाणे रिलीझ झाले आहे.

‘बीपी हाय’ असे या गाण्याचे नाव आहे. या गाण्यात हरियाणवी इंडस्ट्रीची प्रसिद्ध अभिनेत्री प्रांजल दहिया दिसली आहे. गाण्यात प्रांजल दहिया खूपच सुंदर दिसत आहे. या गाण्यात प्रेक्षकांना तिचा देसी लूक पाहायला मिळाला. यासोबतच प्रांजल दहिया आणि अमन जाजीची जबरदस्त जोडी देखील चाहत्यांना या गाण्यात पाहायला मिळाली.

आता हे गाणे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. आतापर्यंत एकाच दिवसात या व्हिडिओला 20 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. प्रांजल दहिया सध्या हरियाणाच्या सुपरस्टार सपना चौधरीला टक्कर देताना दिसत आहे. तिची फॅन फॉलोविंगही सातत्याने वाढतच आहे. तिची बरीच गाणी रिलीझ होताच खूप व्हायरल होत असतात. तिने रेणुका पंवारसह ’52 गज का दामन’ सारखे सुपरहिट गाणे देखील दिले आहे.

रेणुका पंवारबद्दल बोलायचे झाले, तर तिने अगदी लहान वयात स्वत: ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी रेणुकाने तिचे पहिले गाणे गायले होते. ’52 गज का दामन’ या हरियाणवी गाण्याने तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. या हरियाणवी गाण्याने सोशल मीडियावर रेकॉर्ड ब्रेकिंग व्ह्यूज मिळवले. तसेच, या गाण्याच्या व्हिडिओवर 780 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज आले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मानलं पाहिजे! धर्मेश येलांडेने केले होते ऑडिशनमध्ये रिजेक्ट; सहा वर्षांनंतर अभिनेत्रीने त्याच स्टेजवर केले आपल्या चित्रपटाचे प्रमोशन

-व्हिडिओ! ‘कुछ तो है’ मालिकेच्या सेटवरही दिसली होळीची मस्ती, अभिनेत्री कृष्णा मुखर्जीकडून मजेशीर व्हिडिओ शेअर

-खबरदारी महत्त्वाची! बीएमसीच्या कारवाईनंतर अभिनेत्री झाली सावध, स्वत: सोबत फोटोग्राफर्सचेही हात केले सॅनिटाईझ

हे देखील वाचा