‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील लोकप्रिय कलाकार मुनमुन दत्ता (Munmun Dutta) म्हणजेच बबिता जी सध्या वेगळ्याच वादामुळे चर्चेत आली आहेत. एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान बबिताचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला गेल्याने, तिच्यावर सध्या अटकेची टांगती तलवार उभी राहिली आहे. त्यामुळे तिच्या समोरील अडचणी वाढल्याची चिन्हे सध्या दिसत आहेत.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत असलेली मुनमुन दत्ता म्हणजेच बबिता जी सध्या एका मोठ्या वादात सापडली आहे. मुनमुन दत्ताने ९ मे २०२१ला आपल्या युट्युब चॅनलवरून प्रसारित झालेल्या एका व्हिडिओमध्ये अनुसुचित जातींबद्ल एक अपमानकारक वक्तव्य केले होते. ज्यामुळे अनेकांनी रोष व्यक्त केला होता. या आक्षेपार्ह विधानाविरोधात दलित हक्कांसाठी लढणारे वकील रजत कल्सन यांनी हांसी न्यायालयात १३ मे रोजी, एससी एसटी कलंमाखाली गुन्हा नोंद केला होता. इतकेच नव्हे, तर या विरोधात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि राजस्थानमध्येही मुनमुन विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता.
यावर मुनमुनने न्यायालयात धाव घेत, या सगळ्या खटल्यांची सुणावणी एकाच ठिकाणी म्हणजे हरियाणात करण्याची मागणी केली होती. सोबतच मुनमुन दत्ताने सुप्रिम कोर्टाकडे आपल्या विरुद्ध असलेले हे सगळे खटले रद्द करण्याची मागणी केली होती. मात्र सुप्रिम कोर्टाने ही मागणी धुडकावुन लावली होती. यानंतर मुनमुनने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत आपल्याविरोधातील अटकेची कारवाई थांबवण्याची विनंती केली होती. मात्र नंतर तिच्या वकिलांनी हा अर्ज मागे घेतला होता.
या संपुर्ण खटल्याची सुणावणी २५ जानेवारीला हिसार न्यायालयात पार पडली. यावेळी दोन्ही पक्षांनी युक्तीवाद केला मात्र मुनमुन दत्ताची मागणी फेटाळुन लावली आहे. दरम्यान दलित हक्क कार्यकर्ते रजत कल्सन यांनी यापूर्वी ही क्रिकेटपटु युवराजसिंग आणि अभिनेत्री युविका चौधरीवर दलीत समाजाविरोधात आक्षेपार्ह विधान केल्यामुळे गुन्हा नोंद केला होता, ज्यामुळे त्यांनाही जामीन अर्ज करावा लागला होता. आता मुनमुनविरोधात कोणती कारवाई होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
हेही वाचा :