Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

मोठी बातमी! ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम ‘बबिता जी’ला अटक, ४ तास झाली चौकशी आणि…

छोट्या पडद्यावरील सर्वाधिक काळ चालणाऱ्या ‘तारक मेहता का उल्टा चष्मा‘ या मालिकेतून मोठी बातमी समोर येत आहे. या मालिकेत ‘बबिता जी’ हे पात्र साकारणारी प्रसिद्ध अभिनेत्री मुनमुन दत्ताला अटक झाल्याचे वृत्त आहे. सोमवारी (०७ फेब्रुवारी) कोर्टाच्या आदेशानुसार मुनमुन स्वत:विरुद्ध हांसी येथे दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर हजर झाली. त्यानंतर तिला औपचारिकरीत्या अटक करत तब्बल ४ तास चौकशी केली. यानंतर मुनमुनला जामिनावर सोडण्यात आल्याचे समजते.

डीएसपी कार्यालयाबाहेर मुनमुन दत्ताची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक लोकांचा जमाव जमला होता. उच्च न्यायालयाचे वकील आणि उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुनमुन दत्ता स्वत: दोन सुरक्षा कर्मचारी आणि बाऊन्सरसह डीएसपी कार्यालयात पोहोचली होती. या काळात मुनमुन दत्ताने मीडियाशी संवाद साधला नाही. १३ मे, २०२१ रोजी हांसीचे दलित हक्क कार्यकर्ते रजत कलसन यांनी एससी, एसटी कायद्यांतर्गत मुनमुन दत्ताविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

अभिनेत्री मुनमुनच्या अभिनयाबद्दल बोलायचे झाले, तर तिने २००४ मध्ये ‘हम सब बाराती’ या मालिकेमधून अभिनयात पदार्पण केले होते. त्यानंतर ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेमध्ये तिने आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली. या मालिकेमधूनच ती घराघरात पोहोचली. तिच्या आतापर्यंतच्या यशामध्ये या मालिकेचा मोठा वाटा आहे.

पूर्ण झाले आहेत ३३०० भाग
विशेष गोष्ट म्हणजे, या शोने आतापर्यंत ३३०० एपिसोड पूर्ण केले आहेत. हा शो गेल्या १३ वर्षांपासून प्रेक्षकांच्या पसंतीच्या यादीत समाविष्ट आहे. गोकुळधाम सोसायटीतील कुटुंबांची कहाणी शोमध्ये दाखवण्यात आली आहे. जिथे प्रत्येक धर्म आणि संस्कृतीचे लोक एकत्र राहतात. त्यांच्या सोसायटीमध्ये दररोज एक नवीन समस्या येते, जी सर्वजण मिळून सोडवतात, पण या संपूर्ण मालिकेत हशा मात्र कायम आहे.

हेही वाचा-

हे देखील वाचा