भोजपुरी इंडस्ट्रीत अनेक हॉट आणि बोल्ड अभिनेत्री आहेत. त्या त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर हटके अंदाजातील फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांच्या भुवया उंचावत असतात. या अभिनेत्रींमध्ये नम्रता मल्ला हिच्या नावाचाही समावेश होतो. नम्रता ही तिच्या बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाते. अशात ती पुन्हा एकदा तिच्या बोल्ड आणि सेक्सी डान्समुळे इंटरनेटचे तापमान वाढवत आहे. तिचा हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
भोजपुरी अभिनेत्री नम्रता मल्ला (Namrita Malla) हिने लेटेस्ट व्हिडिओत नेट असणारी ब्रा परिधान केली आहे. नम्रता मल्लाच्या या अंदाजावर सोशल मीडियाचा पारा वाढवला आहे. तिच्या ठुमक्यांनी नेटकऱ्यांच्या काळजात घंटी वाजवली आहे.
View this post on Instagram
नम्रताचा सेक्सी डान्स वेधतोय लक्ष
अभिनेत्री नम्रता मल्ला हिने या व्हडिओत ब्राव्यतिरिक्त प्रिंटेड रंगाची स्कर्टही परिधान केली आहे. या अवतारात ती तिची कंबर लचकवताना दिसत आहे. नम्रताच्या बोल्ड आणि कातिलाना एक्सप्रेशन्सने नेटकऱ्यांना घाम फोडला आहे. नम्रता व्हिडिओच्या सुरुवातीला पाठ फ्लॉन्ट करते. त्यानंतर ती जशी पलटते, तशी ती वेगवेगळे मूव्हज दाखवते. नम्रता मल्ला (Namrita Malla Video) हिच्या नवीन व्हिडिओत मेकअपही केल्याचे दिसत आहे. तिने तिच्या डोळ्यांवर चमकी असणारा मेकअप केला आहे. बोल्ड नम्रताने गळ्यात काळ्या रंगाचा नेकलेस परिधान करून ग्लॅमरस लूक पूर्ण केला आहे.
तिच्या या व्हिडिओला 56 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच, जवळपास हजारो कमेंट्सही आल्या आहेत. तिच्या या व्हिडिओवर एकाने कमेंट करत लिहिले की, “काय फिगर मेंटेन केलाय बॉस.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “तुमचे रील्स पाहून मन उडू लागतं.” आणखी एकाने म्हटले की, “शानदार डान्सर.”
नम्रता मल्ला आहे भोजपुरी इंडस्ट्रीची उर्फी जावेद
नम्रता ही एक उत्कृष्ट डान्सर आहे. ती नेहमीच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर नवनवीन व्हिडिओ शेअर करत असते. तिला इंस्टाग्रामवर 16 लाखांहून अधिक चाहते फॉलो करतात. त्यामुळेच कदाचित तिच्या प्रत्येक पोस्टला हजारो लाईक्स मिळतात. नम्रताच्या अदा पाहून तिला नेटकऱ्यांनी भोजपुरी इंडस्ट्रीची उर्फी जावेद असेही म्हटले आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
काय सांगता! पूर्ण कपडे न घालण्यामागे उर्फी जावेदने सांगितले धक्कादायक कारण, तुम्हीही व्हाल हैराण
‘अवतार 2’ने भारतात रचला इतिहास, ‘ऍव्हेंजर्स: एंडगेम’चा विक्रम काढला मोडीत