Thursday, March 28, 2024

‘अवतार 2’ने भारतात रचला इतिहास, ‘ऍव्हेंजर्स: एंडगेम’चा विक्रम काढला मोडीत

जगभरात सध्या एका सिनेमाचा बोलबाला सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. तो सिनेमा इतर कोणताही नसून जेम्स कॅमेरून यांचा ‘अवतार: द वे ऑफ वॉटर‘ हा आहे. या सिनेमाने जगभरात तर बक्कळ कमाई केली आहेच, पण भारतात रिलीज होणाऱ्या हॉलिवूड सिनेमामध्ये अवतार हा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा बनला आहे. विशेष म्हणजे, अवघ्या 4 आठवड्यांमध्येच अवतारने बॉक्स ऑफिसवर हा पराक्रम करून दाखवला आहे.

माध्यमांतील वृत्तांनुसार, भारतात ‘अवतार 2‘ (Avatar 2) या सिनेमाने बक्कळ पैसा छापत रूसो ब्रदर्श यांच्या ‘ऍव्हेंजर्स एंडगेम’ सिनेमाला पछाडले आहे. तसेच, बॉक्स ऑफिसवर डंका वाजवत आहे. भारतात ‘अवतार 2’ सिनेमाची एकूण कमाई ही 454 कोटी रुपये आहे, तर ‘ऍव्हेंजर्स: एंडगेम’ सिनेमाने भारतात एकूण 438 कोटी रुपये कमावले होते. असे म्हटले जात आहे की, ‘अवतार 2’ सिनेमाची नेट कमाई ही 373.25 कोटी रुपये झाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Avatar (@avatar)

‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ (Avatar: The Way of Water) या सिनेमाने भारतीय बॉक्स ऑफिसवर अजूनही धमाल चालूच ठेवली आहे. हा सिनेमा 16 डिसेंबर, 2022 रोजी रिलीज झाला होता. मात्र, अजूनही हा सिनेमा प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचण्यात यशस्वी ठरत आहे. हा सिनेमा इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलुगू कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये रिलीज झाला होता.

हॉलिवूड सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर केली बक्कळ कमाई
खरं तर, ‘अवतार 2’पूर्वी भारतीय बॉक्स ऑफिसवर अनेक हॉलिवूड सिनेमांनी आपला दम दाखवला होता. या यादीत 2019 सालचा ‘ऍव्हेंजर्स: एंडगेम’ (373.22 कोटी), 2018मधील ‘ऍव्हेंजर्स इन्फिनिटी वॉर’ (227.43 कोटी), 2021मधील ‘स्पायडर मॅन नो वे होम’ (218.41 कोटी) आणि 2016मधील ‘द जंगल बुक’ (188.0 कोटी) या सिनेमांचा समावेश आहे.

‘अवतार 1’ने मोडलेले सर्व विक्रम
‘अवतार’ सिनेमाचा पहिला भाग 18 डिसेंबर, 2009मध्ये रिलीज झाला होता. या सिनेमाने जगभरातील सर्व सिनेमांचे विक्रम मोडीत काढले होते. आता ‘अवतार 2’ सर्व विक्रम मोडीत काढत बॉक्स ऑफिसवर धमाल करताना दिसत आहे. (avatar the way of water beats avengers endgame to become highest grossing hollywood film in india know more)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘मेरी डीपी इतनी धांसू, चित्रा मेरी सासू’, उर्फी पुन्हा चित्रा वाघ यांच्याशी नडली
शाहरुखसोबत काम करणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीने उरकला साखरपुडा, 26व्या वयात बनणार नवरी

हे देखील वाचा