लाेकप्रिय अभिनेत्री नयनतारा आणि अभिनेता विघ्नेश शिवन यांनी काही दिवसांपूर्वी आई – बाब झाल्याची घोषणा केली होती. लग्नाच्या 4 महिन्यांनंतर विघ्नेशने सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे ते जुळ्या मुलांचे पालक झाल्याचे सांगितले. मात्र, त्यानंतर विघ्नेश आणि नयनतारासाठी नवा वाद सुरु झाला. दोघांनीही मुलासाठी सरोगसीचा अवलंब केला होता, जो त्यांच्यावर भारी पडला. कारण, आता सरकार या प्रकरणाची दखल घेत आहे. तरीदेखील आतापर्यंत या जोडप्याने सरोगसीच्या माहितीवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण, नयनतारा आणि विघ्नेशचे पालक बनण्यात सरोगसीचा सहभाग असल्याची चर्चा इंटरनेटवर जोरात सुरू आहे.
अभिनेत्री नयनतारा (nayanthara) आणि विघ्नेश शिवन (vignesh shivan) पालक झाल्यावर तामिळनाडूचे आरोग्य मंत्री मा सुब्रमण्यम यांनी प्रश्न उपस्थित केले आणि हे देखील सांगितले की, संपुर्ण प्रकरणाचे कायदेशिर चाैकशी केली जाईल.
View this post on Instagram
नयनतारा आणि विघ्नेशने सहा वर्षांपूर्वी केले हाेते लग्न
माध्यमांतील वृत्तानुसार, नयनतारा आणि विघ्नेशने सहा वर्षांपूर्वी त्यांच्या लग्नाची नोंदणी केली होती. या जोडप्याने प्रतिज्ञापत्रासोबत लग्नाची कागदपत्रेही सादर केल्याची माहिती आहे. याशिवाय, या जोडप्याने सरोगेट आई त्यांची नातेवाईक असुन युएईमध्ये राहत असल्याचे उघड केले आहे.
View this post on Instagram
राज्य सरकारने त्या रुग्णालयाची ओळख करुन घेतली आहे जिथे नयनतारा आणि विघ्नेश शिवन या जुळ्या मुलांचा जन्म झाला. सरोगसीच्या कायदा 2021 नुसार, कोणत्याही जोडप्याला पालक बनण्यासाठी सरोगसीचा पर्याय निवडायचा असेल, तर त्यांचे लग्न पाच किंवा त्याहून अधिक वर्षांचे असले पाहिजे आणि सरोगेटला इच्छुक पालकांचे ते जवळचे नातेवाईक असणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत नयनतारा आणि विघ्नेश शिवन सांगतात की, त्यांनी हे सर्व नियम आणि प्रक्रिया तंतोतंत पाळल्या आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
तायक्वांदो सामन्यात शाहरुखचा लेक विजेता! अबरामने आनंदात घेतले वडिलांचे चुंबन, पाहा व्हिडिओ
…आणि मरण्यापुर्वी स्मिता पाटील यांनी सांगितली होती ‘ती’ अनोखी शेवटची इच्छा.! काय होती ती इच्छा!