Friday, April 26, 2024

…आणि मरण्यापुर्वी स्मिता पाटील यांनी सांगितली होती ‘ती’ अनोखी शेवटची इच्छा.! काय होती ती इच्छा!

स्मिता पाटील भारतीय सिनेसृष्टीतील एक खणखणीत वाजणारं नाणं! दुर्दैवाने ते आजच्याच दिवशी काही वर्षांपूर्वीच कालवश झालं. परंतु हे नाणं इतकं खणखणीत वाजलं होतं की त्याचा खणखणाट आजता गायत आपल्याला ऐकू येत आहे.

स्मिताचं असं अकस्मात जाणं प्रत्येकाला चटका लावून गेलं. परंतु आपल्याला माहीत आहे का, की स्मिताने जाण्यापूर्वी एक अंतिम इच्छा सांगितली होती. आज मंगळवारी (13 डिसेंबर)राेजी स्मिता यांचा स्मृति दिन आहे. त्या निमित्ताने आपण त्यांची शेवटची इच्छा आणि तिचा जीवनपटावर प्रकाश टाकणार आहोत. (before death smita patil had stated her last wish know why her mother hated her)

स्मिता यांच्या आयुष्याच्या सुरुवातीचा टप्पा…
स्मिता यांनी पुण्याच्या एफ.टी.आय.आय. मधून शिक्षण घेतलं असलं, तरी त्यांना चित्रपटांमध्ये करियर करायचं नव्हतं. योगायोगाने त्यांची इच्छा नसताना देखील त्यांना सिनेसृष्टीत पदार्पण करावं लागलं.

खरं तर त्यांना आणलं गेलं म्हणाना! आपल्याला तर ठाऊकच आहे की या सिनेसृष्टीत भले भले आले आणि देशोधडीला लागले. परंतु जे जिद्दी आणि प्रामाणिक होते तेच त्यांचं नाव कमावू शकले. आणि याच व्यक्तींपैकी स्मिता होत्या.

त्यांना जरी आणलं गेलं होतं, तरी त्यांचा अभ्यास फार दांडगा होता. त्यांची सतत काही तरी शिकत राहण्याची वृत्तीच त्यांना इतकं यश देऊन गेली.

…..आणि स्मिताचं काम बोलू लागलं
आधी नकार दिल्यानंतर आई वडिलांच्या म्हणण्यानुसार श्याम बेनेगल दिग्दर्शित ‘चरणदास चोर’ या सिनेमाद्वारे त्त्यांनी त्यांच्या सिने कारकिर्दीची सुरुवात केली. यानंतर त्यांनी पुन्हा कधी मागे वाळूनच पाहिलं नाही. हिंदी आणि मराठी या दोन चित्रपट सृष्टीमध्ये त्या एकाचवेळी कार्यरत होती.

मंथन, आक्रोश, भूमिका, उंबरठा, सामना, नमकहलाल, मंडी, अर्धसत्य, जैत रे जैत हे त्यांचं काही गाजलेले मराठी आणि हिंदी सिनेमे आहेत. उंबरठा मधील सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या हे स्मितावर चित्रित झालेलं गाणं प्रेक्षकांना आजही स्मृतींमध्ये काही काळ मागे घेऊन जातं.

स्मिताच्या लग्नाला आई विद्याताईंचा होता विरोध…
स्मिता आणि राज बब्बर यांची ‘भिगी पलकें’ सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान मैत्री झाली. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. लग्नाविषयी चर्चा होऊ लागली. परंतु आई विद्याताईंचा या लग्नाला साफ नकार होता. याला कारणही तसंच होतं म्हणा…

राज बब्बर यांचं आधीच त्यांची पत्नी नादिया यांच्याशी लग्न झालं होतं. आणि तरीही स्मिता त्यांच्या प्रेमात पडल्या होत्या. त्यांना त्यांच्याशीच लग्न करायचं होतं. जे त्यांनी पुढे जाऊन केलं देखील. परंतु आईचा रोष मात्र त्यांनी ओढवून घेतला.

…आणि त्यांनी तिची शेवटची इच्छा सांगितली.
लग्न झाल्यानंतर स्मिता आनंदात राहत होत्या. स्मिता काही दिवसातच गरोदर राहिल्य. राज आणि स्मिता यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला. त्याच नाव दोघांनी मिळून प्रतीक असं ठेवलं. पण काळापुढे कुणाचं काहीच चालत नाही.

प्रतिकच्या जन्मानंतर काही दिवसातच म्हणजेच 13 डिसेंबर 1986  रोजी स्मिता आपल्या सर्वांना अकस्मात सोडून निघून गेल्या.
मरण्या अगोदर काही दिवसांपूर्वी त्यांनी शेवटची इच्छा बोलून दाखवली होती. ती अशी की, ‘जर त्या गेल्या तर त्यांना सवाष्ण महिले प्रमाणे नटवून निरोप द्यायचा. आणि अक्षरशः सवाष्ण महिलेप्रमाणेच स्मिता यांनी या जगाचा निरोप घेतला.’

दहा वर्षांच्या दैदिप्यमान कारकिर्दीत त्यांनी मराठी आणि हिंदी भाषेतील तब्बल 80 चित्रपटात काम केलं. आणि आपणा सर्वांना अमर्याद आनंद दिला. स्मिता यांनी दोनदा राष्ट्रीय पुरस्कार, तर 1985 साली चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं.

चला तर मग त्यांच्या पवित्र स्मृतीस समरण करून आपल्याला स्मिता यांचा कोणता चित्रपट आवडतो हे आम्हाला कंमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अमृताने दाखवला हॉट अंदाज, फोटो गॅलेरी पाहाच
‘देवों के देव महादेव’ची ‘पार्वती’ होणार नवरी, साखपुड्याचे फोटो व्हायरल

हे देखील वाचा