बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता यांनी त्यांच्या प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. त्याचबरोबर त्या त्यांच्या फॅशन वरून देखील त्या अनेकदा चर्चेत येतात. नीना गुप्ता यांची गणना त्या अभिनेत्रींमध्ये केली जाते, ज्या त्यांच्या उत्साहासाठी ओळखल्या जातात. तसे पाहिले तर नीना खऱ्या आयुष्यात खूपच स्टायलिश आणि मस्त राहायला आवडते. वयाच्या ६२ व्या वर्षी त्यांचा फिटनेस वाखाणण्याजोगा आहे. नीना गुप्ता यांचा या वयातील फिटनेस नवीन पिढीसाठी देखील प्रेरक आहे. अनेकदा त्या त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. ज्यात लोकं त्यांची प्रत्येक स्टाईल आवडीने बघतात आणि त्यावर प्रतिक्रिया देतात.
ब्युटी विथ ब्रेन असणाऱ्या नीना यांची प्रत्येक स्टाईल कॉपी केली जाते. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या नीना गुप्ता यांनी नुकताच त्यांचा नवीन लूक फॅन्ससोबत शेअर केला आहे. ज्यात त्या नवीन हेअर स्टाईल करताना दिसत आहे. या नवीन लुकमध्ये नीना स्टाईलच्या बाबतीत आजच्या अनेक अभिनेत्रींना मागे टाकतील अशा दिसत आहे.
नीना गुप्ता यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये नीना गुप्ताची नवीन हेअर स्टाईल पाहायला मिळत आहे. या नवीन हेयर स्टाईलमध्ये त्या खूपच सुंदर आणि अधिकच तरुण दिसत आहेत. नवीन हेअरस्टाईलमध्ये नीना यांनी त्यांचे केस लहान केले असल्याचे दिसत असून, त्या लहान केसांमध्ये देखील त्या आकर्षक वाटत आहे. त्यांनी या नवीन लूकमागील त्यांचे कारण लोकांसोबत शेअर केले आहे. खरं तर, नीना गुप्ता यांचा हा नवा लूक ‘मसाबा मसाबा’ च्या नवीन सीझनसाठी आहे.
या नवीन हेअर स्टाईलचा फोटो त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. नीना गुप्ता यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘माझा नवीन हेअर कट.’ कांता मोटवानीला टॅग करत, या नवीन हेअर स्टाइलसाठी नीना गुप्ता यांनी आभार मानले. फॅशन डिझायनर आणि अभिनेत्री असणारी मसाबा गुप्ता ही नीना गुप्ता यांची मुलगी आहे. ‘मसाबा मसाबा सीझन २’ या मालिकेत नीना गुप्ता त्यांच्या मुलीसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या शोचा पहिला सीझन २०२० मध्ये नेटफ्लिक्सवर रिलीज झाला होता. जो लोकांना खूप आवडला होता. लोकांमध्ये त्याची लोकप्रियता पाहता, या शोचा दुसरा सीझन लवकरच येणार आहे. नीना गुप्ताचा हा नवा लूक त्यात दिसणार आहे.
त्यांच्या या शेअर केलेल्या पोस्टमध्ये नीना गुप्ता या लूकबद्दल सांगताना दिसत आहेत. लोकं त्यांच्या नवीन हेअरस्टाईलचे कौतुक करत आहेत. लोकांनी त्यांच्या नवीन लूकचे कौतुक करत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सनी त्यांना ‘सुंदर’ म्हटले आहे. तर काहींनी ‘जबरदस्त’ म्हटले आहे. काहीजण त्यांच्या या लूकने इतके प्रभावित झाले आहेत की, ते त्यांची ‘अशीच हेअर स्टाइल हवी आहे’ असे म्हणत आहेत.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-सिद्धार्थचा अंतिम प्रवास सुरू, लवकरच होणार पंचतत्वात विलीन
-‘मृत्यू हे आयुष्यातील सर्वात मोठे…’, मृत्यूनंतर सिद्धार्थ शुक्लाचे जुने ट्वीट व्हायरल
-सिद्धार्थ शुक्लाने शहनाझ गिलच्या कुशीत घेतला अखेरचा श्वास? म्हणाली, ‘मी आता कसं जगू शकेन’