Friday, July 5, 2024

सोनम कपूर ते करीना कपूरपर्यंत अनेक अभिनेत्रींना आवडतात मसाबाने डिझाईन केलेले कपडे, पाहा तिची स्टाईल

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता यांना आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. नीना यांनी मेहनतीने आपले खास स्थान मिळवले आहे. आता त्यांच्या पावलांवर पाऊल टाकत त्यांची मुलगी मसाबा गुप्ताही आपले नाव कमावताना दिसत आहे, पण ते वेगळ्या क्षेत्रात. मसाबा बुधवारी (३ नोव्हेंबर) आपला ३२ वा वाढदिवस साजरा करत आहे. मसाबा ही बॉलिवूडच्या सर्वोत्तम फॅशन डिझायनरपैकी एक आहे. सोनम कपूरपासून ते करीना कपूर खान आणि शिल्पा शेट्टीपर्यंत अनेक अभिनेत्री मसाबाने डिझाईन केलेले कपडे आवडीने परिधान करतात. मसाबा स्वत: डिझायनर आहे, म्हणल्यावर तीदेखील तितकीच स्टायलिश राहत असणार यात शंकाच नाही. चला तर तिच्या वाढदिवसानिमित्त पाहूया तिचे एकापेक्षा एक स्टायलिश फोटो.

मसाबा सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते. इथे ती आपले अनेक स्टायलिश फोटो शेअर करत असते. मसाबाचे इंस्टाग्रामवर १.६ मिलियन म्हणजेच १६ लाख फॉलोव्हर्स आहेत. त्यामुळेच तिचे फोटो पोस्ट होताच, व्हायरल होऊ लागतात. (Actress Neena Guptas Daughter Masaba Gupta Celebrating 32nd Birthday)

मसाबा ही एक प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे आणि ती प्रत्येक लूकमध्ये सुंदर दिसते.

सोनेरी रंगाच्या गाऊनमध्ये मसाबा खूपच आकर्षक दिसत आहे.

मसाबाचा कॅज्युअल लूकही लक्षवेधी आहे.

मसाबाने सब्यासाचीचे कलेक्शनही प्रमोट केले आहे. सब्यासाचीच्या लेहंग्यात मसाबाचे रूप अगदी पाहण्यासारखे आहे.

केवळ स्टायलिश ड्रेसमध्येच नाही, तर बिकिनीतही मसाबा चाहत्यांचे लक्ष वेधून घेते.

मसाबाने आतापर्यंत अनेक ब्रँड्सचे प्रमोशन केले आहे.

मसाबा गुप्ताचा फॅशन सेन्स अगदी वाखाणण्याजोगा आहे.

मसाबाबद्दल बोलायचं झालं, तर २०१५ मध्ये चित्रपट निर्माता मधु मंटेना याच्याशी तिने विवाह केला होता. मात्र, दोघेही २०१९ मध्ये मतभेदांमुळे वेगळे झाले, आणि त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. आज मसाबा ही तिची आई नीना गुप्ता यांच्यासोबत राहते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘सलमान एकटा असून, त्याला खास व्यक्तीची गरज आहे’, म्हणत महेश मांजरेकरांनी केले दबंग खानच्या लग्नावर वक्तव्य

-असे काय झाले की, आपल्याच पोटच्या मुलाला विसरली जिनिलिया देशमुख? व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल

-‘एक दिवस ती नक्कीच माझी पत्नी होईल’, ‘अशी’ आहे ‘मिस इंडिया’ स्वरूप अन् परेश यांची लव्हस्टोरी

हे देखील वाचा