Sunday, May 19, 2024

‘एक दिवस ती नक्कीच माझी पत्नी होईल’, ‘अशी’ आहे ‘मिस इंडिया’ स्वरूप अन् परेश यांची लव्हस्टोरी

कॉमेडी असो किंवा खलनायकाची भूमिका, परेश रावल हे आपल्या दमदार अभिनयासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांची प्रत्येक स्टाईल ही त्यांच्या चाहत्यांना खूप आवडत असते. चित्रपटांमध्ये जितक्या वेगवेगळ्या भूमिका त्यांनी साकारल्या आहेत, तितक्याच रंगांनी त्याचे वैयक्तिक जीवन भरलेले आहे. त्यांच्या पत्नीचे  नाव स्वरूप संपत असे आहे. या दोघांची लव्हस्टोरी खूप रंजक आहे. स्वरूप शुक्रवारी (03 नोव्हेंबर) आपला 65 वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांचा जन्म 3 नोव्हेंबर, 1958साली झाला होता. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण या लेखातून त्यांची आणि परेश यांची लव्हस्टोरीबाबत जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया…

पहिल्या नजरेतच झालं होतं प्रेम
एका मुलाखतीदरम्यान परेश रावल म्हणाले होते की, “स्वरूप संपत यांचे वडील भारतीय राष्ट्रीय रंगमंचाचे निर्माता होते. मी माझ्या काही मित्रांसोबत बंगाली नाटक पाहण्यासाठी गेलो होतो, तेव्हा तिथे मला स्वरुप पहिल्यांदा दिसली आणि मी तिच्या प्रेमात पडलो. शेजारी बसलेल्या माझ्या मित्राला मी सांगितले की, एक दिवस ही मुलगी माझी बायको होईल. त्यानंतर माझ्या मित्राने मला विचारले, ती कोणाची मुलगी आहे, हे तरी तुला माहित आहे का? मी मात्र मनापासून सांगितले होते की, एक दिवस ती नक्कीच माझी पत्नी होईल.”

अशी सुरू झाली लव्हस्टोरी
परेश रावल यांनी सांगितले की, त्या दिवसापासून 1 वर्ष स्वरूप संपत यांच्याशी त्यांचे बोलणे झाले नव्हते. असेच एक दिवस परेश रावल यांचे नाटक पाहिल्यानंतर, स्वरूप त्यांना भेटण्यासाठी बॅकस्टेजवर आल्या आणि त्यांनी विचारले की, “ऐका, तुमचे नाव काय आहे?” या प्रश्‍नानंतर परेश आणि स्वरूप यांच्या खास भेटी सुरू झाल्या आणि मैत्रीही झाली.

या चित्रपटात स्वरूप संपत यांनी केलंय काम
स्वरूप संपत यांनी1979मध्ये मिस इंडियाचा किताब आपल्या नावे केला होता. चित्रपटसृष्टीतही त्यांनी बरीच कामे केली आहेत. स्वरूप संपत यांनी ‘ये जो है जिंदगी’ या कॉमेडी टीव्ही शोमध्ये उत्तम काम केले होते. याशिवाय त्यांनी ‘नरम गरम’ (1981), ‘साथिया’ (2002) आणि 2019 मध्ये आलेल्या ‘उरी’ चित्रपटातही काम केले आहे. चित्रपटात काम करण्यासोबतच स्वरूप संपत आता विशेष मुलांना अभिनय शिकवतात.

या दोघांचे लग्न 1987 साली झाले होते व त्यांना आता दोन मुले आहेत. त्यांच्या मुलांची नावे आदित्य आणि अनिरुद्ध असे आहे.

हम दो हमारे दो मध्ये दिसणार
बारा वर्षानंतर परेश आणि स्वरूप यांनी लग्न केले आणि आता ते खूप खुश आहेत. स्वरूपने काही चित्रपटांमध्ये व टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. जसे की, ‘हिम्मतवाला’, ‘साथिया’ होय.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-
मृणालने शेअर केला परेश रावलसोबत काम करण्याचा अनुभव; म्हणाली, भविष्यातही कॉमेडी चित्रपट करायला आवडेल’
‘यारियां’ चित्रपटातून प्रसिद्धी मिळवलेला हिमांश करायचा ‘रेडिओ जॉकी’ची नोकरी, नेहा कक्करवर होते जीवापाड प्रेम

हे देखील वाचा