सिनेसृष्टी कोणतीही असो, तिथे तग धरून राहणे हे प्रत्येकासाठीच आव्हानात्मक असते. कलाकारांना जर खूप जास्त सिनेमांमध्ये काम करायचे असेल, तर त्यांना तशी मेहनतही घ्यावी लागते. मात्र, काहींना मेहनत घेऊनही बाहेर फेकले जाते. अशीच एक अभिनेत्री आहे, जिने अनेक पुरस्कार मिळवून आणि मोठमोठ्या सिनेमात काम करूनही तिला आता काम मिळणेही कठीण झाले आहे. धक्कादायक बाब अशी की, त्या अभिनेत्रीला एका बिझनेसमनने २५ लाख रुपये महिना असलेली पगारी पत्नी बनण्याची ऑफरही दिली होती. कोण होती ती अभिनेत्री चला जाणून घेऊया…
ती अभिनेत्री इतर कुणी नसून नीतू चंद्रा (Neetu Chandra) आहे. नीतू हिने तिच्या आयुष्यातील अशा घटनेबद्दल सांगितले आहे, जी ऐकून किंवा वाचून कुणाच्याही पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. तिने माध्यमांशी बोलताना सांगितले की, तिला एका बिझनेसमनने त्याची पगारी पत्नी बनण्यास सांगितले होते. याबदल्यात तो तिला महिन्याला २५ लाख रुपये देण्यासही तयार होता. तिने सांगितले की, तिने १३ राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांसोबत काम करूनही तिच्याकडे कोणतेही काम आणि पैसे नव्हते. तिने एका ऑडिशनबाबत सांगितले, ज्यामध्ये एका प्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टरने तिला एका तासातच रिजेक्ट केले होते.
‘पैसे आणि काम नव्हते’
नीतू चंद्रा हिने माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “माझी कहाणी एका यशस्वी अभिनेत्रीची अयशस्वी कहाणी आहे. १३ पुरस्कार विजेते कलाकार आणि इतक्या मोठ्या सिनेमांमध्ये काम करूनही आज माझ्याकडे कोणतेही का नाहीये. मला एका बिझनेसमनने म्हटले होते की, तो मला महिन्याला २५ लाख रुपये देईल. मात्र, मला त्याची पगारी पत्नी बनावे लागेल. माझ्याकडे पैसे आणि काम दोन्हीही नव्हते. मला चिंता वाटू लागली, एवढे काम करूनही मला इथे नको असल्यासारखे वाटत होते.”
ऑडिशननंतर एका तासातच झाली होती रिजेक्ट
नीतूने पुढे सांगितले की, “एका कास्टिंग डायरेक्टर, ज्याचे मोठे नाव आहे, पण मी नाव घेणार नाही. ऑडिशनवेळी त्याने मला एका तासाच्या आतच सांगितले की, ‘मला माफ कर नीतू, हे होऊ शकणार नाही.’ त्याने माझे ऑडिशन घेऊन मला रिजेक्ट केले, जेणेकरून माझा आत्मविश्वास तुटेल.” वरील वृत्त बॉलिवूड हंगामा या मनोरंजन वेबसाईटने दिले आहे.
View this post on Instagram
‘या’ सिनेमातून केले होते पदार्पण
नीतूबद्दल बोलायचं झालं, तर तिने ‘गरम मसाला’ या २००५ साली प्रदर्शित झालेल्या सिनेमातून बॉलिवूड पदार्पण केले होते. या सिनेमात ती एअरहोस्टेस होती. यामध्ये तिच्यासोबत अक्षय कुमार आणि जॉन अब्राहम यांच्याही भूमिका होत्या. यानंतर ती ‘ट्रॅफिक सिग्नल’, ‘वन टू थ्री’, ‘ओये लकी लकी ओये’, ‘१३ बी’ आणि ‘अपार्टमेंट’ यांसारख्या सिनेमात काम केले होते.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘नवरा गेल्यावर हिला तर पंख फुटलेत’, नीतू कपूरने ट्रोलर्सला दिले खणखणीत शब्दात उत्तर
‘गुड लक जेरी’साठी जान्हवी कपूरने शिकल्या होत्या बिहारी शिव्या